जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथे दिनांक 20 मार्च रोजी जळगाव जामोद पोलिसांनी टाकलेल्या धाडीमध्ये वाहनासह दोन लाख 88 हजार रुपयाचा महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेला गुटखा पकडण्यात जळगाव जामोद पोलिसांच्या पथकाला यश आले आहे.या कारवाईमध्ये गुटख्या सह निंभोरा येथील आरोपी महादेव प्रल्हाद हरमकार वय 45 वर्ष व ज्ञानेश्वर जगन्नाथ पारस्कर वय 22 वर्षे राहणार निंभोरा या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सविस्तर असे की जळगाव जामोद पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शना मध्ये एक पथक तयार करण्यात आले सदर पथकामध्ये पोलीस नाईक अनिल सुशिर, पोलीस नाईक उमेश शेगोकार, पोलीस शिपाई सचिन राजपूत, पोलीस शिपाई उंबरहांडे हे होते. सदर प्रकरणी या पथकाने सिनेस्टाईल गुटखा वाहतूक प्रकरणात वापरण्यात आलेल्या गाडीचा पाठलाग करीत भेंडवळ बुद्रुक येथे प्रतिबंधित केलेल्या गुटख्यासह आरोपींना पकडले असता. त्यांच्या ताब्यातून एक टाटा सुमो एम एच ०४ ईएस १२४० यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला बोलो जुबा केसरी असे लिहिलेले एका प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये आठ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे कट्टे एका कट्ट्यामध्ये ५० पाऊच असे एकूण ४०० प्लास्टिक पाऊच एका प्लास्टिक पाऊच ची किंमत 187 रुपये असा एकुण 74 हजार 800 रुपयांचा मिळून आला तसेच व्ही एन तंबाखू बावीस पाऊच इन साईड लिहिलेले ४०० प्लास्टिक पाकीट प्रत्येक पाऊच ची किंमत 33 रुपये असा एकूण 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल दोन्ही मिळून मुद्दे मालाची किंमत 88 हजार रुपये व वाहनांची किंमत दोन लाख रुपये असा एकूण दोन लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात या पथकाला यश आले आहे. सदर आरोपींना पोलीस कोठडीत डांबले असून सदर प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर भास्कर हे करीत आहेत. सदर आरोपींवर अप नं १५७/२०२२ कलम ३२८,१८८,२७२,२७३, भादवी चे सहकलम अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम २६(२)(आय),२६(२)(आय व्हि)२७(३)(डि)(ई)५९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.