स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती... भारतीय जनता पार्टी तर्फे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील तहसील चौकातील शिवाजी महाराज पुतळा तसेच डीडोळकर उद्यान येथील शिवाजी महाराज पुतळा येथे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी तहसील चौकात माजी जिल्हा महामंत्री नंदू भाऊ अग्रवाल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सीमाताई डोबे, तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, युवा मोर्चा अध्यक्ष उमेश येउल, युवमोर्चा तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकरे यांनी शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टी चे सर्व कार्यकर्ते हे डीडोळकर उद्यान येथे महाराजांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहिले. याठिकानी महाराजांना वंदन करून अभिवादन केले. या उत्साहवर्धक कार्यक्रमाला लताताई तायडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा सुचेता उमाळे, महिला शहर अध्यक्षा शिल्पा भगत, रवींद्र सेठ ढोकने, कैलास डोबे, करण सिंग सर, अशोक नानकदे,सुरेश इंगळे, अरुण खिरोडकार, ओंकार वानखडे, गजानन सरोदे,बाळू कुटे,राम वानखडे, अतुल दंडे, अमोल म्हसाळ, बाळू चव्हाण, सखाराम ताडे, सुनील रघुवंशी, गणेश आप्पा, गोटू खत्ती, शकिर खान, अप्पा, राजू हिस्सल,पांडू मिसाळ,कैलास पाटील, अजय वंडाले, रमेश कोथळकार, बंडू मुळतकर, गणेश अरुडकर, शरद खवणे, अक्षय देशमुख, पंकज देशमुख, शुभम चांडाले, आशिष सारसर, अमोल भगत, सचीन कल्याणकर, गणेश दांडगे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी...
जळगांव जा.प्रतिनिधी:-