जळगाव जा.प्रतिनिधी:-
कंत्राटी पद्धतीने नोकरभरती.दत्तक शाळा योजना.रुग्णालय खाजगी कंपनी ना चालविण्यासाठी देणे.शासकीय रुग्णालय नांदेड,संभाजी नगर, ठाणे, नागपूर येथील रुग्णांच्या मृत्यू ची जबादारी घेऊन मा.आरोग्य मंत्री यांनी राजीनामा देण्यात यावा.पटसंख्ये अभावी शाळा बंद. करण्यात येणे,शेतकऱ्यांना पीक विमा व आर्थिक मदत तात्काळ मिळण्यात यावी इत्यादी मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जामोद च्या वतीने दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.युवक,शेतकरी, आर्थिक दुर्बल घटकाला भेडसावनाऱ्या विषयांवर शासन अतिशय उदासिन आहे. कंत्राटी भरती सारखे तुघलकी निर्णय घेऊन शिंदे-फडनवीस-पवार यांच तिघाडी सरकार आधीच बेरोजगारीच्या समस्येने ग्रासलेल्या युवकांना वेठिस धरण्याच काम करित आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसेनजीत पाटिल यांच्या नेतृत्वात वरील जनतेला भेडसावनाऱ्या समस्यांसंदर्भात महाराष्ट्र सरकार विरोधात निषेध आंदोलन करुन जळगांव जामोद तहसिल कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. कंत्राटी भरतीचा निर्णय मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून उग्र आंदोलनाचा ईशारा प्रसेनजीत पाटिल यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष एम.डी.साबीर, ईरफान खान, करीम खान, संजय ढगे, संजय देशमुख, सिध्दार्थ हेलोडे, मोहसिन खान, दत्ता डीवरे, निजाम राज, सतीष तायडे, अरविंद जुमडे, सदाशिव जाने, ताहेर माही, शंकर अढाव, पवन डिवरे, रेहान अहमद, शेख जावेद, शे. फैजान, अंकित हेलोडे, रेहान अहमद जियाउल्लाः देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
