निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीपासून शेतकर्यांना शाश्वत उत्पादन मिळावे यासाठी सिंचन क्षेत्र वाढ होण्याची गरज आहे़ त्यामुळे अडान नदी पात्रावर बॅरेजेस मंजुर करण्यासाठी खा़ भावनाताई गवळी यांनी वारंवार पत्रव्यवहार व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधित खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा आणि शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला़ या प्रयत्नांना अखेर यश आले असून आज ८ रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन बॅरेजेस निर्माणाला मंजुरी दिली़ या निर्णयामुळे मंगरुळपीर तालुक्यातील सुमारे अडीच हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्राला सिंचन सुविधा उपलब्ध होणार असल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे़ या संदर्भात खा़ भावना गवळी यांनी शासनाला पत्र देवून सिंचनवाढीसाठी भरीव कामाची गरज व्यक्त केली़ होती.वाशीम जिल्हा हा आकांक्षीत जिल्हा असून जिल्हयातील शेतकरी बांधव कित्येक वर्षांपासून बॅरेजेस निर्माणाची मागणी करती आहेत़ त्यादृष्टीने वाशीम जिल्ह्यातील अडाण नदीवरील अडाण प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रामध्ये येणार्या गोदावरी खोर्यातील पैनगंगा उपखोर्यामधील मंगरूळपीर तालुक्यातील घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा येथील बॅरेजेसला पाणी उपलब्ध करून संदर्भीय किंमतीनुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आल्या होत्या़ परंतु सदरच्या बॅरेजेसला शासनाकडून निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे सदरची कामे होऊ शकले नाहीत. परिणामी, सन २००९ पासून आज पर्यंत नव्याने कुठलीही मान्यता प्राप्त झालेली नसल्यामुळे त्या भागातील शेतकर्यामध्ये निराशा निर्माण झाली होती़ वरील बॅरेजेस होण्याकरीता या भागातील शेतकर्यांची मागणी लक्षात घेता या प्रकल्पांना मंजुरी देण्याची आवश्यकता असल्याची बाब खा़ भावना गवळी यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली़ तसेच वारंवार पत्रव्यवहार व मुख्यमंत्री, एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व संबधित खात्याचे मंत्री यांच्याशी चर्चा केली.शिवाय गत काही वर्षांपासूनच्या नापिकीमुळे जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा हतबल झाला असल्याने या प्रकल्प मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला़ या मागणीची दखल घेत राज्य सरकारने बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पांना मंजुरी दिली़ त्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील घोटा शिवणी, बोरव्हा व सत्तरसावंगा येथे बॅरेजेस निर्माणाचा मार्ग मोकळा झाला़ या बॅरेजेसमुळे तालुक्यातील जवळपास अडीच हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार असून शेतकड्ढयांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येण्यास मदत होणार आहे़ वाशीम-यवतमाळ मतदार संघाच्या खासदार भावना गवळी यांनी शेतकरी हितासाठी पोटतिडकीने केलेल्या पाठपुराव्यामुळे सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे़.पैनगंगेवरील बॅरेजसाठी पाठपुरावा करणार जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात वाढ होण्याकरिता पैनगंगा नदीवर आणखी बेरीज होणे अत्यंत आवश्यक आहे. हे बॅरेजेस लवकरात लवकर मंजूर व्हावे याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे खासदार भावनाताई गवळी यांनी यावेळी सांगितले.
मंगरुळपीर तालुक्यातील अडान नदीवरील बॅरेजेसला मंजुरी..अडीच हजार क्षेत्राला सिंचनाचा लाभ..खा़ भावनाताई गवळी यांच्या पाठपुराव्याला यश...
विश्वास कुटे वाशिम जिल्हा प्रतिनिधी...