भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कर्तव्यात कसूर...शेतकऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले उपोषणासह देहत्यागचे निवेदन...


 भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांचा कर्तव्यात कसूर...शेतकऱ्याने उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले उपोषणासह देहत्यागचे निवेदन...

जळगांव जामोद(प्रतिनिधी): 

पिंप्री खोद्री शिवारातील सर्वे क्रमांक १८ व २० मधील गट क्रमांक ३६ च्या शेताची हद्द कायम करून देण्यासाठी दि. ६ जून २०२३ रोजी भूमी अभिलेख कार्यालय जळगांव जामोद येथे मोजणीचा अर्ज केला होता; त्यानुसार दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी गट क्रमांक ३६ ची अर्धवट व अचूक मोजणी करून वारंवार मागणी केल्या नंतर सहामाहिन्यांनी 'क प्रत' उपलब्ध करून दिली. त्यात एकाबाजूच्या मोजमापाची माहितीच न टाकता अर्धवट व अचूक असल्याचे स्पष्ट दिसून आले. या प्रकरणी तक्रार अर्ज दाखल करून परत मोजणीकामी भूकरमापक शेतात आले आणि पुन्हा मोजमाप केले व सुधारित 'क प्रत' दि. १७/०९/२०२५ रोजी उपलब्ध करून दिली. सुधारित क प्रतिचे सविस्तर निरीक्षण केल्यावर त्यात ठळक ८ त्रुटी दिसून आल्यामुळे ही क प्रत सुद्धा दिशाभूल करणारी ठरली; त्यातील शेताचा आकार, क्षेत्रफळातील तफावत आणि हद्दीच्या खुणा जोडणाऱ्या बांधाची जागा बदल्यामुळे सुधारित क प्रत मूळ अभिलेखाशी जुळत नसल्याचे स्पष्ट दिसले. यासर्व तक्रारीसाठी गेल्या तीन वर्षापासून सातत्याने भूमी अभिलेख कार्यालय जळगांव जामोद यांच्याकडे लेखी तक्रार अर्जद्वारे न्याय मागत असून प्रत्येक वेळी दिशाभूल करणारे दिशानिर्देश या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून तोंडी व लिखित स्वरूपात मिळाले.दि. १७/०९/२०२५ रोजी सुनावणी वेळी मी सुधारित क प्रत मिळाली म्हणून सही केली; त्या सहीच्या आधारे माझ्या शेत मोजणीचे प्रकरण चुकीच्या पद्धतीने अभिलेख तयार करून निकाली काढल्याचे उत्तर जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातून माहिती अधिकार कायद्यात प्राप्त कागदपत्रांतून समजले. त्यात नमूद पत्रांच्या आधारे माझ्या तक्रारी विना कार्यवाही निकाली काढून दप्तरी दाखल केल्या; परंतु, माझ्या शेत मोजणीचे प्रकरण कायदेशीर पद्धतीने पूर्ण न करता वेगवेगळे लिखित आदेश देऊन चुकीच्या क प्रती दिल्यात.  अधिकाऱ्यांचे आदेश दिशाभूल करणारे असून त्यात कायद्याचे उल्लघंन करून बेकायदेशीर अभिलेख तयार केलेत. याबाबत संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना लिखित स्वरूपात विचारणा केली असता कुठलीही कायदेशीर कारवाई केल्याच दिसत नाही. त्यामुळे मी दि. २८ मे २०२६ पासून सकाळी १०.०० वाजे पासून उपोषण करण्याबाबत निवेदन  उपविभागीय अधिकारी जळगांव जामोद यांना दिले असून आठ ते नऊ प्रमुख मागण्या करण्यात आले आहे.. 

उपोषणाचे वेळापत्रक :-

१) दि. २८/०५/२०२६ - लाक्षणिक उपोषण (गुरुवार)

२) दि. २९/०५/२०२६ -अन्नत्याग उपोषण (शुक्रवार)

३) दि. ३०/०५/२०२६ - जलत्याग उपोषण (शनिवार)

४) दि. ३१/०५/२०२६ -देहत्याग उपोषण (रविवार)    उपरोक्त विषयी गांभीर्यपूर्वक लक्ष घालून सन्माननीय अधिकारी व कर्मचारी कायदेशीर कारवाई करून योग्य मुदतीत कायदेशीर अभिलेख पुरवतील.

Previous Post Next Post