जळगाव जामोद(प्रतिनिधी):
दिनांक 26/4/2026 रोजी जळगाव जामोद पोलिस स्टेशनच्या हद्दीत मौजे राजुरा येथील राजुरा धरणाजवळ एक अनोळखी महिलेचा धड व मुंडके वेगळे केलेल्या अवस्थेत अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. सदर महिलेचा मृतदेह डीएनए टेस्ट न करता संबंधीत जळगाव जामोद पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी मध्यप्रदेशातील खकनार येथील रहिवाशी शिवाणी कळमेकर हिचे वडील बापुराम नथथू कळमेकर व भाऊ अजय बापुराम कळमेकर रा. खडकी (म.प्र ) यांनी शिवाणी ही तिच्या चुलत भावासोबत पळून गेल्याबाबत मिसिंगचा रिपोर्ट असल्याने बेपत्ता असलेली संशयीत महिला म्हणून तीचे वडील व भाऊ यांना धाक दपटीने बेकायदेशीर जातीवाचक शिवीगाळ करुन, मारहाण करुन न केलेला गुन्हा कबुल करण्यास भाग पाडले. सदर शिवाणीचे वडील व भाऊ हे अतिशय गरीब कुटुंबातील आदिवासी प्रवर्गात मोडत असुन त्यांना कायद्याचे फार ज्ञान नसल्याने पोलिसांच्या त्रासाला व दबावाला कंटाळून त्यांनी नाईलाजास्तव पोलिसां समक्ष गुन्हाची कबुली दिली मात्र गुन्ह्याची कबुली त्यांना मान्य नाही व सदर गुन्हाच त्यांनी केला नव्हता.याच दरम्यान बेपत्ता असलेली शिवाणी कळमेकर हि बुरहानपुर पोलिस स्टेशनला दिनांक 27/5/2026 रोजी ती स्वता शिवाणी कळमेकर असल्या बाबतचे एकूण सर्व कायदेशीर कायदपत्र घेऊन हजर होताच तेथील पोलिसांनी बेपत्ता असलेली तरुणी शिवानीला जळगाव जामोद पोलिस स्टेशनला हजर केले असता शिवाणी हिने कबुली दिली की ती जिवंत असताना बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनिल अंबुलकर व त्यांचे सहकारी तसेच जळगाव जामोदचे पोलिस निरीक्षक नितीन पाटिल व त्यांचे सहकारी यांनी बेकायदेशीरपने, कायद्याचा कोणताही आधार न घेता शिवाणीच्या वडील व भावाला बेकायदेशीरपने तुरुंगवास भोगावा लागला व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याच्या नाहक त्रासाला बळी पडून त्यांचे व्यक्ति स्वातंत्र धोक्यात आले आहे व पोलिसांच्या या अकृत्यामुळे त्यांचे जीवन जगणे कठिण झाले आहे. वास्तविक पाहता पोलिसांनी त्यांच्या पदाला शोभेल अशी कार्यवाही न करता विनाकारण गोरगरीब आदिवासी समाजातील लोकांना जातिवाचक शिवीगाळ करुन त्यांना नाहक तुरूंगवास भोगावा लागल्यामुळे संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अक्ट्रासिटी एक्ट नुसार गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ बड़तर्फ करण्याची मागणी महाविकास आघाड़ी तर्फे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार ) चे जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटिल, शिवसेना (उबाठा ) पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन वाघ यांनी निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा तथा विभागीय पोलिस आयुक्त अमरावती यांच्याकड़े केली आहे.
