जळगाव जामोद (प्रतिनिधी):
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून रोजी बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी, बुलढाणा द्वारा संचालित सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे शाळेचे अध्यक्ष डॉ. किशोर केला आणि मुख्य संयोजिका डॉ. सौ. स्वाती केला यांच्या शुभहस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले... पर्यावरण समतोल राखणे आणि वृक्ष संवर्धन करण्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने शाळेमध्ये दरवर्षीच वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते... या माध्यमातून शाळेच्या परिसरात विविध वृक्षांची लागवड करून विद्यार्थ्यांनी त्यांचे संवर्धन केल्याने शालेय परिसर वनराईने नटला आहे... यावर्षी शाळेमध्ये कडुलिंब, वटवृक्ष,पिंपळ याचसोबत विविध जीवनपयोगी वृक्षांची लागवड उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली... याप्रसंगी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे, विनोद ईश्वरे, योगेश घाटोळे, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ, यांच्या सह शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते..
