शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन...


शेतकरी विरोधी सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे अर्धनग्न आंदोलन...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी:

महाराष्ट्राचा शेतकरी शेवटच्या घटका मोजत आहे.कर्ज काढून मोठ्या आशेने तो लाखो रुपयांचे बि - बियाणे, खते कळ्या मातीत फेकतो.त्याला पाणी देतो.शेतकरी व शेतमजूर पीक फुलवतात अन् ऐन कापणीच्या वेळेवर निसर्ग कोपतो,त्यातून जे थोडेफार पीक हाताशी येते त्याला सरकार भाव देत नाही.यामुळे शेतकरी पुरता अडचणीत येतो व वारंवार त्याला कर्जमाफी मागावी लागते.त्याला या संकटातून काढणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.करिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना नांदुरा तहसील मार्फत अर्धनग्न आंदोलन करून पत्र पाठविले आहे.ज्यात पुढील मागण्या नमूद आहेत.

१) कोणत्याही अटी शर्तीचे निकष न लावता तत्काळ शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी

२) नुकताच आलेला वादळी वारा व अवकाळी पाऊस यामुळे केळी,लिंबू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.त्यांना तात्काळ एकरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी.

३)शेतकऱ्याला दिवसा वीज द्यावी.जेणेकरून जंगलात रात्री अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेल्यामुळे कित्येक शेतकरी साप, व हिंस्त्र पशूंचे बळी पडले आहे.त्यापासून बळीराजाचा जीव वाचेल.

४)विदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले जिगाव धरणाच्या कामाला गती मिळावी व तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा.

५) नांदुरा तालुक्यात उसाचा पेरा वाढला आहे.त्या उसाला विमा कवच मिळावे.गेल्या वर्षी वादळी वाऱ्यामुळे शेकडो एकरावरील ऊस अक्षरशः झोपला यामुळे ऊस उत्पादक  शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

६)ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे व खते यांचा तुटवडा भासवून त्यांच्याकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जाते याला चाप बसवा

७) बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र ते बनावट बियाणे बनविणाऱ्या कंपन्या यांना थेट सिल लावण्यात यावे.

८)कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर न सोडता त्यांना भरीव आर्थिक मदत व सातबारा कर्जमुक्त करून मिळावा

अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक शिवश्री योगेश पाटील व शिवश्री निलेश देशमुख सर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष शिवश्री अमर रमेश पाटील,तालुका दिलीप कोल्हे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.यावेळी जिल्हा मार्गदर्शक विनोद वनारे,जिल्हा सचिव मंगेश सोळंके,जिल्हाकार्याध्यक्ष सचिन बाठे,जिल्हा संघटक कुलदीप डंबेलकर, तालुका उपाध्यक्ष भगीरथ मनस्कार,विद्यार्थी आघाडी जिलाध्यक्ष पवन सोळंके,वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष अमोल भगत,ऑटो रिक्षा आघाडी तालुकाध्यक्ष विलास वक्टे,विजय मनस्कार पाटील,रवींद्र वनारे,वैभव वक्टे, तेजराव इंगळे,किशोर इंगळे,देविदास भोपळे,विजय गव्हाणे,ज्ञानेश्वर मापारी,कैलास अहिर,प्रकाश खंडागळे,सुभाष गव्हाणे,बळीराम इंगळे,जानराव इंगळे,देवेंद्र जयस्वाल,हर्षद धांडे,नितीन धांडे,गणेश धांडे,पुरुषोत्तम भातुरकर,साहेबराव इंगळे,निंबाजी वानखडे,भरत अवचार,विठ्ठल सारोकार,संतोष वानखडे,बळीराम देवकर,वासुदेव बोदडे,गोपाळ देवकर,अभिषेक सोळंके व इतर बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

Previous Post Next Post