बुलढाणा(प्रतिनिधी):
माउंट एवरेस्ट बेस कॅम्प , कळसुबाई शिखर ,शितकडा ,कोकणकडा केदारकंठां सर करून तेथे तिरंगा ध्वज आणि भगवा ध्वज फडकवणाऱ्या दहा वर्षीय धाडसी सिद्धीचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि राज्याचे गृह महसूल ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते काल गौरव करण्यात आला.
बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक या लहानशा गावात राहणारे विठ्ठल ज्ञानदेव सोनवणे यांची दहा वर्षीय कन्या सिद्धी हीने जिद्द धैर्य आणि सहासी पणा दाखवून वयाच्या सातव्या वर्षा कळसुबाईचे शिखर सर केलं त्यानंतर केदारकंठा कोकण कडा आणि नुकताच माउंट एवरेस्ट बेस्ट कॅम्प सर केला आहे प्रत्येक शिखरावर जाऊन तिने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भगवा ध्वज आणि तिरंगा फडकून राष्ट्रगीताने मान मानवंदना दिली आहे अवघ्या दहा वर्षाच्या सिद्धीच धाडस हे कौतुकास्पद असून जिल्ह्यासाठी अभिमानाचा आहे सिद्धीच्या या धाडसी आणि पराक्रमी सहासाबद्दल केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि या राज्याचे गृह महसूल ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांनी मेहकर पंचायत समितीच्या उद्घाटन कार्यक्रमात सिद्धीचा सत्कार केला .याच वेळी सिद्धीने उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करण्याची इच्छा मंत्री महोदयासमोर व्यक्त केली दोन्ही मंत्र्यांनी तिच्या या धाडसी पणाला वाव देऊन माईक तिच्या हातात दिला . यावेळी सिद्धीने आतापर्यंत केलेल्या सहासी कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला त्यावेळी उपस्थितांनी तिचं टाळ्या वाजवून कौतुक केलं याशिवाय सिद्धीने आतापर्यंत 2 राज्यस्तरीयसह 25 मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे . केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सिद्धीला वेळोवेळी मदतीचा हात देण्यात आला आहे .
