मलकापूर ग्रामीण हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणारा जेरबंद; ९३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...


 मलकापूर ग्रामीण हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणारा जेरबंद; ९३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त...

बुलढाणा जिल्हा(प्रतिनिधी):

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून सुमारे ९३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.९ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, एक इसम आपल्या मोटारसायकलवरून विनापरवाना देशी दारूची चोरटी वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी उमाळी शिवारात सापळा रचून नाकाबंदी केली. यावेळी मोहन नयनसिंग जाधव (वय ३७, रा. गिरणी, ता. मलकापूर) याला संशयास्पद स्थितीत थांबवून तपासणी केली असता, त्याच्याकडे अवैध देशी दारूचे १० बॉक्स आढळून आले.

​जप्त केलेला मुद्देमाल:देशी दारू: १० बॉक्स (किंमत ४३,२०० रुपये)मोटारसायकल: एक (किंमत ५०,००० रुपये)​एकूण किंमत: ९३,२०० रुपये

आरोपी मोहन नयनसिंग जाधव याच्याविरुद्ध मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही व त्यांच्या पथकातील प्रताप बाजड, गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पूजा साळवे, कोमल इंगळे आणि मनोज खरडे यांनी केली आहे.

Previous Post Next Post