प्रशांत डिक्करच्या नाट्यमय पलायनात दोन पोलिसांचा नाहक बळी.. दोन्हीही पोलीस कर्मचाऱ्यांचा चूक नसतानाही जात आहे बळी...


 जळगांव(जामोद)प्रतिनिधी:-

जळगाव संग्रामपूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने महापुरात अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून शेतीचे अतोनात नुकसान झाले.पीडित कुटुंबाला तसेच शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी २८ ऑगस्ट पासून उपविभागीय अधिकारी जळगाव. येथे अन्नत्यागआंदोलन सुरू केले होते.स्वाभिमानीच्या आंदोलनाला ३०ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने  सुद्धा पाठिंबा देऊन रास्ता रोको आंदोलन केले त्यामुळे प्रशासना समोर मोठे एक आव्हान निर्माण झाले.मात्र ३० ऑगस्टच्या रात्री म्हणजेच ३१जुलै पहाटे उपोषणकर्ते प्रशांत  डिक्कर उपोषण सभा मंडपातून अचानक गायब झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली, दरम्यान प्रशांत डीक्कर यांना वास्तविक कोणीही पळून नेले नसून तेच स्वतःच पळून गेल्याचे  वास्तव्य त्यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ वरून सिद्ध झाले आहे.असे असताना सुद्धा दिनांक ३० ऑगस्ट च्या रात्री अन्नत्याग मंडपामध्ये पहारा देणारे पोलीस नाईक शांतीलाल धीरजबस्सी आणि पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती झाल्टे यांना कर्तव्यात कसूर केल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिनांक १ सप्टेंबर रोजी निलंबित केले आहे.सदर दोन्हीही पोलीस कर्मचारी हे आपला पहारा देत होते. त्यातच लघुशंकेला जातो हे कारण देऊन डीक्कर निघून गेले.   दोन निरपराध पोलीस कर्मऱ्यांवर निलंबनाची झालेल्या कारवाई विषयी जनमानसात रोष व्यक्त होत असून त्यांच्या प्रती सहानुभूती मिळत आहे. तसेच त्या दोघां वर झालेली निलंबन कारवाई मागे घ्यावी अशीही जन माणसांची भावना आहे..घडलेल्या सर्व घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाने डीक्कर यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या रोशन देशमुख याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून  त्यांची कसून चौकशी करत आहे .

Previous Post Next Post