जळगांव जामोद मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न.एकजूट होऊन पूर्ण ताकती निशी विजयश्री खेचून आणू - मा.आ.दिनेश गुर्जर, निरीक्षक बुलढाणा जिल्हा...


 
जळगांव जामोद मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न.एकजूट होऊन पूर्ण ताकती निशी विजयश्री खेचून आणू - मा.आ.दिनेश गुर्जर, निरीक्षक बुलढाणा जिल्हा...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

दि.16 ऑक्टोबर 2024 जळगांव जामोद येथील सातपुडा कॅम्पस येथिल उमादेवी सभागृहात जळगांव जामोद मतदार संघाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता.या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.श्री. कृष्णरावजी इंगळे, प्रमुख अतिथी  बुलढाणा जिल्हा काँग्रेस प्रभारी मा.आ.श्री.दिनेशजी गुर्जर, विधानसभा निरीक्षक मा.श्री.शामभाऊ उमाळकर, निरीक्षक सुनिल सपकाळ, जिल्हा समन्वयक अविनाश उमरकर, प्रदेश सचिव तथा पक्षनेता डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, प्रदेश सचिव रामविजयजी बुरुंगले, प्रकाशभाऊ पाटील ,ज्योतीताई ढोकणे, शैलेंद्रदादा पाटील, अंबादास बाठे, तेजरावजी मारोडे, संतोषभाऊ राजनकार, प्रकाशबाप्पू  देशमुख, मनोहरराव  बोराखडे, अमर पाचपोर, समाधान दामधर , आसिफ इकबाल ,डॉ.असलम खान , राजेश्वर बाप्पू  देशमुख, जहीर मिस्त्री, शामभाऊ डाबरे, भाऊराव भालेराव, मारोती सुरडकर, पांडव गुरूजी, मोहन रौंदळे, प्रमोद पाटील, बाबुभाई जमादार, गजानन ढगे आदी मान्यवर उपस्थित होते..सदर कार्यक्रम वेळी डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर, प्रकाश पाटील, किरणबाप्पू  देशमुख , समाधान दामधर, श्रीकृष्ण केदार, अजहर देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी जळगांव जामोद विधानसभा मतदार संघ निरीक्षक श्यामभाऊ उमाळकर यांना आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार कसा जिंकुन येईल या विचाराने काम केलं पाहिजे असे सांगितले.बुलढाणा जिल्हा काँग्रेस प्रभारी निरीक्षक आ. दिनेश गुर्जर यांनी आपल्या भाषणात प्रत्येक बूथ वर कार्यकर्त्यांनी कसे नियोजन केले पाहिजे व आपला बुथ निवडणुकीत कसा पुढे राहील यासाठी मतदार संघातील बुध कमिटी यांचा आढावा घेतला.जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कायम प्रभृत्व राहिले आहे. विधानसभा निवडणुकीत सुध्दा काँग्रेस चा विजय निश्चित असल्याचा आशावाद महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाच्या पक्षनेत्या डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी व्यक्त केला.या मतदारसंघात काँग्रेस मध्ये पक्षांतील सर्व नेते,पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह काँग्रेस विचारधारेशी प्रामाणिक असणारे सर्व सामान्य मतदारसंघाच्या मनात काँग्रेसच्या माध्यमातुन विश्वास निर्माण झालेला आहे.त्यामुळे ही विधानसभा निवडणुक सर्वसामान्य,शेतकरी,कष्टकरी लोकांच्या हक्क मिळविण्यासाठी आपण लढत आहोत. त्यामुळे काँग्रेस विचारांशी व नेतृत्वाशी प्रामाणिक असणारे सर्वचं ही निवडणुक एकजुटीने लढणार आणि जिंकणार सुध्दा आहे हा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र वानखडे तर आभार प्रवीण भोपळे यांनी केले.सदर कार्यक्रमास जळगांव जामोद विधानसभा मतदार संघातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post