जळगांव जामोद तालुक्यातील टाकळी खासा रस्त्याच्या बाबत दिनांक ९ सप्टेंबर रोजी टाकळी खासा येथील नागरिकांनी जळगांव जामोद येथे रस्त्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग यांना निवेदन देण्यात आले. सदर रस्ता कामाचे भूमिपूजन होऊन सुद्धा काम कोणी करावे याबाबत प्रशासन संभ्रमात.जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा काठ परिसर हा नेहमी वाळू तस्करी करिता प्रसिद्धीच्या झोतात असतो. परंतु आज रोजी सुद्धा या भागात पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.असाच एक प्रकार जळगाव जामोद तालुक्यातील गोळेगाव ते टाकळी खासा या रस्त्या संदर्भात झालेला आहे.सदर रस्त्याचे भूमिपूजन झाल्यानंतर सुद्धा या रस्ता कामाला आज पर्यंत सुरुवात का झाली नाही हा नागरिकांना मोठा प्रश्न पडत आहे.लोकप्रतिनिधी या रस्त्या बाबत ऐवढे उदासीन का?या रस्त्याची अवस्था जणू काही शेत रस्त्या असलेल्या गाड रस्त्या सारखी झालेले आहे. सदर रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे आणि काळ्या मातीचे चिखल असून या रस्त्यावरून वाहने तर सोडा पायदळ जाणे सुद्धा कठीण झालेले आहे. या गावातील शेतकरी यांना आपल्या बैलगाडीने शेतात जाणे सुद्धा कठीण झाले असल्याने सदर रस्त्याची अवस्था काय असेल हे प्रशासनाने जाणून घेतले तर बरे होईल..असा प्रश्न परिसरातील नागरिक करीत आहे.तसेच शाळा आज ना उद्या ऑफ लाईन सुरू होणारच मग विद्यार्थी आपल्या शाळेचा रस्ता या चिखलमय रस्त्यातून आपली वाट कशी शोधतील हा सुद्धा मोठा यक्ष प्रश्न आहे.तरी या विषयाकडे प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या रस्त्यावर ए.टी.एम टाकण्यात यावे तसेच या रस्त्याचे डांबरीकरण प्रधानमंत्री ग्रामीण सडक तसेच मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत रस्ता टाकण्यात यावा.अन्यथा बांधकाम विभागास ग्रामस्थांनच्या रोशाला सामोरे जावे लागेल.या मागणीसाठी आज जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले यावेळी अक्षयभाऊ पाटील ,प्रफुल पोटे,गजानन पोटे ,मोहन घुळे यांच्यासह बहुसंख्य टाकळी खासा येथील ग्रामस्थ निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.
गोळेगाव ते टाकळी खासा रस्ता झाला चिखलमय शेतकऱ्यांकरिता/ग्रामस्थांनसाठी ठरतोय डोकेदुखी..
जळगांव जा.प्रतिनिधी:-