दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मकर संक्रांतीनिमित्त विशेष गो पूजनाचा कार्यक्रम जळगाव जामोद येथील गौरक्षण संस्थेमध्ये कोविड नियमाचे पालन करून दिनांक 14 जानेवारी रोजी संपन्न होत आहे अशी माहिती संस्थाचे विद्यमान अध्यक्ष सुरेश मोदी यांनी RC24 न्युजशी बोलताना सांगितले.जळगाव शहरात फार जुन्या काळापासून स्थापन झालेल्या गौरक्षण संस्थांमध्ये मकर संक्रांति निमित्य दरवर्षी गो पूजन केले जाते. ही परंपरा फार जुन्या काळापासून सुरू हा कार्यक्रम कोरोना काळात सुध्दा नियमाला धरून मोजक्याच भक्ताच्या उपस्थितीत साजरा केल्या जातो.यावर्षी सुद्धा महाराष्ट्रात तसेच बुलढाणा जिल्ह्यात कोरीनाचे सावट मोठ्या प्रमाणात असल्याने सदर कार्यक्रम हा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दिनांक 14 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दोन च्या दरम्यान संपन्न होणार आहे. अशी माहिती अध्यक्ष सुरेश मोदी यांनी दिली आहे.शासनाने दिलेल्या नियमात राहून गो पूजनाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
गौरक्षण संस्था जळगाव जामोद येथे गौ.पूजन कार्यक्रमाचे 14 जानेवारीला आयोजन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-