अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाची जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील गौतम नगर येथे चालत असलेल्या वरली मटका जुगार च्या ऑफिस वर दिनांक 29 मार्च रोजी टाकली धाड. अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना गुप्त माहिती मिळाली की जळगाव जामोद येथील गौतम नगर मधील राहणारा संदीप मारुती वानखडे हा त्याचे राहत्या घरात तसेच जळगाव जामोद तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये व शहरातील विविध ठिकाणी तीनशे रुपये रोजाने एजंट ने मोत्यांना वरली मटका जुगार खेळ खेळून लोकांकडून पैसे स्वीकारून सदर जुगार आकडे गौतम नगर येथे असलेल्या त्यांच्या वरली-मटक्याचा ऑफिसवर मोबाईल फोन द्वारे चालवत आहे अशा गुप्त व खात्रीलायक खबरी प्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी त्यांच्या पथकाला आदेश दिल्याप्रमाणे पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन बोरसे नाईक पोलीस कॉन्स्टेबल गजानन आहेर, संदीप टाकसाळ राम धामोडे अनिता गायकी निर्गुणा सोनटक्के यांनी जळगाव जामोद देखील संदीप मारुती वानखडे यांचे राहते घरावर महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे छापा टाकून वरली मटका जुगाराचा खेळ खेळवित असणारे 6 आरोपी यांना जागीच पकडले नमूद आरोपीतांकडून वरली मटका आकडे घेण्यासाठी वापरण्यात आलेले 9 मोबाईल किंमत अंदाजे नऊ हजार रुपये तसेच वरली मटका जुगार खेळण्याकरिता वापरलेले साहित्य असा एकूण दहा हजार 640 रुपयाचा मुद्देमाल पथकाने जप्त केला. वरली मटका जुगाराचा मुद्देमाल व वरली मटका जुगार चालविणाऱ्या संदीप मारुती वानखडे या आरोपी सह इतरां विरोधात कलम 4,5 महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपींना जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाचा जळगावात जुगार वरली मटका आँफिसवर छापा.10 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
