माजी मंत्री आ डॉक्टर संजय कुटे यांनी पुल,रस्ते,इमारतीच्या कामांसाठी 33 कोटी रुपयाचा निधी आणला खेचुन...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

नुकतेच राज्या चे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले या अधिवेशनाच्या माध्यमातून जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ संजय कुटे यांनी रस्ते, पूल व इमारतीच्या कामांसाठी तब्बल 33 कोटी रुपये इतका भरीव निधी खेचून आणला आहे.यामध्ये प्रजीमा 68 वर लहान पुलाचे बांधकाम करणे करिता 237.5 लक्ष रुपये, प्रजी मा 65 वर संरक्षक भिंत व रस्त्यासह लहान पुलाचे बांधकाम करणे करिता 190 लक्ष रुपये, प्रजीमा 68 वर लहान पुलाचे पोचमार्गासह बांधकाम करणे करिता 285 लक्ष रुपये, प्रजीमा 66 वर रस्ता व संरक्षक भिंती सह लहान पुलाचे बांधकाम करणे करीता 190 लक्ष रुपये, रामा 47 वर लहान पुलाचे बांधकाम करणे करिता 300 लक्ष रुपये, प्रजीमा 65 वर लहान पुलाचे बांधकाम करणे करिता 285 लक्ष रुपये, जळगाव जामोद येथील न्यायालयीन इमारतीच्या पहिल्या मजल्या चे उर्वरित बांधकाम व ईतर आनुषंगिक कामे करनेकरीता 328 लक्ष, तर मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व बांधकाम करणे करिता 1500 लक्ष रुपये इतका निधी खेचून आनन्यात आ डॉ संजय कुटे यांना यश आले आहे. लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदर कामांना सुरवात होणार आहे. या कामांसाठी आ डॉ संजय कुटे यांनी विशेष प्रयत्न केले असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना दळण वळण च्या दृष्टीने सोयी चे  होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदी वातावरण आहे.

Previous Post Next Post