शासनाकडून देण्यात येणारा धान्य गोरगरीब रेशन कार्डधारकांना ई पॉस मशीन द्वारा वितरण केला जातो परंतु आज रोजी ई पॉस मशीन डोकेदुखी झाली आहे जळगाव जामोद तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अनेक समस्यांना तोंड सुद्धा द्यावा लागतो यासंदर्भात आज आज 22 मार्च रोजी तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे विनंती केली आहे की सर्वर वर सतत येत असलेल्या तांत्रिक समस्यांमुळे तसेच आधार सलग्न सार्वजनिक वितरण अंतर्गत एनआयसी नवी दिल्ली व हैदराबाद येथील सर्वर वर येत असलेल्या अतिरिक्त ताणामुळे मागील दोन तीन महिन्यापासून तालुक्यासह संपूर्ण राज्यात ई पॉस मशीन द्वारे होणारे धान्य वितरण विस्कळीत झाले आहे तसेच ई पॉस मशीन ह्या टूजी प्रणाली वर चालू असून ह्या सर्व मशीन कालबाह्य झाल्या आहेत या सर्व अडचणीमुळे धान्य वितरण दुकानदारांना प्रति शिधापत्रिकाधारकां मध्ये रोज व असंतोष वाढत चालला आहे इत्यादी बाबी निवेदनामध्ये नमूद केलेले आहे 31 मार्च पर्यंत या संदर्भात कोणताही निर्णय न झाल्यास एक एप्रिल दोन हजार बावीस पासून जळगाव तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार आपल्या ई पॉस मशिने तहसील कार्यालयात जमा करतील असा इशारा सुद्धा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदन देताना जिल्हा कार्याध्यक्ष रंगराव देशमुख,नीलेश देशमुख स्वस्त धान्य दुकानदार जिल्हा उपाध्यक्ष,तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर तालुका कार्याध्यक्ष संजय देशमुख वाल्मीक राव ठाकरे श्याम जाधव शालिग्राम दाते विजय चांडक आर एफ तायडे एच एस बाठे एन एस आलासे शेगोकार यांच्यासह स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते
स्वस्त धान्य दुकानदार एक एप्रिल ला ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात करणार जमा....
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
