श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांचा इतिहास प्रेरणादायी..आ डॉ संजय कुटे

जळगांव जा.प्रतिनिधी:-

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य  निष्ठेने व जबाबदारीने वाढविले मराठा साम्राज्याच्या सिमा सिंधु नदी पर्यंत वाढविल्या.मराठा साम्राज्याच्या साठी आपले आयुष्य पणाला लावले.अशा धुरंधर महापराक्रमी शुरविर श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांचा इतिहास प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आ डॉ संजय भाऊ कुटे यांनी केले.श्री संत गजानन महाराज मंदिर खांडवी येथे २० मार्च रोजी राजे मल्हारराव होळकर जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्व प्रथम राजे मल्हारराव होळकर व संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटक मा मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष भाजपा आमदार डॉ संजय भाऊ कुटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार नानाभाऊ कोकरे साहेब प्रमुख उपस्थिती सौ डॉ स्वातीताई वाकेकर प्रदेश सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी , श्री प्रसेनजित दादा पाटील प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,  श्री वामनराव खाळपे धनगर समाज जेष्ठ नेते, श्री प्रशांत भाऊ डिक्कर विदर्भ अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, श्री निलेश  घोंगे जिल्हा उपाध्यक्ष प्रहार संघटना श्री प्रकाश वाघ तालुकाध्यक्ष भाजपा, श्री अविनाश उमरकर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी, श्री प्रमोद सपकाळ तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, श्री प्रमोद तितरे प्रशासक कृ उ बाजार समिती, चंद्रकांत दादा माने प्रदेश उपाध्यक्ष धस युवा मल्हार सेना, श्री ऍड निवृत्ती बोरसे जिल्हा कार्याध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना, श्री शामराव मुळे आसलगाव, श्री एकनाथ भिवटे नांदुरा धनगर समाज युवा मल्हार सेना जिल्हा सचिव, श्री भागवत खाळपे धानोरा, श्री विठ्ठल सुशिर सरपंच गोळेगाव बु , श्री रामरतन चोपडे सरपंच झाडेगाव, सौ कविताताई निलेश उमाळे सरपंच खांडवी सौ मंगलाताई संतोष बावस्कार, जयकुमार डोंगरदिवे ग्रा पं सदस्य, मंचावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दिलीप भिवटे अध्यक्ष राजे मल्हारराव होळकर जन्मोत्सव समिती तथा जिल्हाध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना, सुत्रसंचलन श्री अशोक भाऊ साबे तर आभार प्रदर्शन श्री वाघमारे सर यांनी केले.यावेळी श्री मनोहर खाळपे सर यांनी राजे मल्हारराव होळकर यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमास श्री अजय तितरे जिल्हा उपाध्यक्ष धनगर समाज युवा मल्हार सेना, योगेश चराटे तालुकाध्यक्ष, श्री गोपाल पातुर्डे नांदुरा तालुकाध्यक्ष, श्री सागर घुले शेगाव तालुकाध्यक्ष, श्री विठ्ठल दिवनाले, श्री निलेश खाळपे, श्री विजय काळदाते, श्री सुधिर घोंगे, श्री विनोद काळंगे, श्री शिवदास कात्रे,श्री विठ्ठल पाचपोर, श्री सुनील भिवटे, श्री प्रभाकर मोळे, श्री गोपाल वाघमारे, श्री संजय फासे, श्री किसन बाजोळे, श्री गजानन वसतकार, श्री राम वरखडे , श्री देविदास मोहे, श्री विनोद पुंडे, श्री महादेव भिवटे, श्री गजानन भिवटे, श्री दत्ता भिवटे उपस्थित होते

 

Previous Post Next Post