हतरू,माडीझडप, जंगलात, रात्री पुन्हा आदिवासी युवकांना वनविभागा कडून जबरदस्त मारहाण केल्याप्रकरणी वनविभागाच्या कर्मचारी विरोधात चिखलदरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीतील हतरू (रायपुर) येथील युवक दादू बेठेकर वय 24 बाबूलाल भुमया धांडे, मुंग्या बाजीलाल ठाकरे,भाऊलाल मोतीलाल ठाकरे , हतरू हे घरी भाजीला काही नसल्याने माडीझडप शेतशिरात नदीकाठी खेकडे व मासोळी पकडण्यासाठी नाल्यावर गेले असता रायपूर येथील वनरक्षक श्री वरुळकर व त्यांचे सहकारी श्री शेलार यांना जंगलाच्या दिशेने आढळून आले.वरील युवकांना पकडून त्यांनी शिविगाड केली व अंगावरील कपडे काढून झाडाला बांधून मारण्याचा प्रयत्न केला असे पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीत दादू बेठेकर यांनी सांगितले आहे.गावात पोळा असल्याने आम्ही घडलेल्या तारखेच्या दिवशी चिखलदरा पोलीस स्टेशन येथे येऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी युवकांना त्रास झाल्या नंतर  त्यांनी चिखलदरा पोलीस स्टेशन येथे येऊन सत्य हकीकत फिर्याद दाखल केली चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी घटनेचे गंभीरता पाहून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्या विरोधात चौकशी करून वनविभाग चे अधिकारी, कर्मचारी रायपूर येथील कार्यरत श्री वरुडकर व श्री शेलार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन चिखलदरा फिर्यादीच्या सांगण्यावरून कलम 323/504/506 प्रमाणे गुन्हे दाखल केले असून वरील युवकांना कोरकू जातीवादी केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.आदिवासी अत्याचार जातीवाचक कायद्याअंतर्गत चौकशीनंतर गुन्हे दाखल करण्यात येतील व व आदिवासींना जातीवादी बोलल्या गेल्याने त्यांचे विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी संबंधित गावकऱ्यांनी केलेली आहे. माडीझडप  हतरू रायपुर येथील अनेक आदिवासी नागरिक पोलीस स्टेशन चिखलदरा येथे गोळा झाले होते.या अगोदर सुद्धा ढाकणा येथील वन अधिकाऱ्यांनी एका मुस्लिम बैल जोडी विक्रेत्याला बेदम मार करून त्याचा मृत्यू झाला होता असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता दुसऱ्या घटनेत वन वनपरिक्षेत्र फॉरेस्ट येथील कर्मचाऱ्यांनी पशु प्राणी समजून धुळघाट रेल्वे येथील तीन युवकाला नुकतीच बेदम मारहाण केली आहे ह्या घटना ताज्या असताना पुन्हा रायपूर जंगलात अशा पद्धतीची वागणूक वनकर्मचारी यांनी दिली आहे. त्या मुळे आता मेलघाट मध्ये वन विभाग व सामान्य आदिवासी नागरिकात भविष्यात मोठा संघर्ष समोरा - समोर होणार असल्याच्या चर्चा आदिवासी नागरिकां मध्ये सुरू आहेत.मेळघाट मधील कार्यरत  कर्मचाऱ्यांनी देखील हे समजून घेणे आवश्यक आहे की जोपर्यंत शरीरावर खाकी वर्दी आहे तो पर्यंतच आपली ताकद आहे एक वेळा अंगावरची वर्दी उतरल्यानंतर शेवटी सामान्य नागरिकासारखंच आपल्याला राहावं लागत आहे त्यामुळे आदिवासी क्षेत्रात जंगलाचे संरक्षण करताना सामान्य नागरिकां मध्येच मिळून नोकरी करावी ,,? अन्यथा आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा,तंट्या राघोजी , यांनीं जसे ब्रिटिशांचा विरोधात आपली लढाई केली व आदिवासी समाजाला ,उलगुलनाचा नारा दिला आता संपूर्ण मेळघाट मध्ये उलगुलान पेटणार आहे.पुन्हा हे आदिवासी क्रांतिवीर बिरसा येणार आहे.  असा सुर तर स्वातंत्र्य मेळघाट मध्ये ऐकायला मिळणार नाही ना अशा चर्चा जन सामान्यां मधून ऐकायला मिळाल्या.

Previous Post Next Post