जळगाव जामोद तालुक्यातील दुर्गम,डोंगराळ भागातील जि.प.शाळा चारबन येथे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षा नंतर कायम स्वरूपी गावठाण फिडर ची विद्युत आली त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.जळगांव जा तालुक्यातील डोंगराळ,आदिवासी भागातील चारबन शाळेत अग्रीकल्चर चा विद्युत पुरवठा होता. त्यामुळे आठवड्यातून फक्त 3 दिवस व त्यातही फक्त 2,3 तास शाळेत लाईट राहत होती त्यातही गेल्या वर्ष भरापासून शाळेत विद्युत पुरवठा नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याचे शिक्षकांचे स्वप्न भंग झाले होते.शिक्षकांनी लोकवर्गणीतून शाळेसाठी कम्प्युटर,3 टीव्ही,इन्व्हर्टर, पंखे,प्रोजेक्टर मिळविले आहेत परंतु शाळेत विद्युत पुरवठा नव्हता त्यामुळे शिक्षक दिपक उमाळे यांनी पुढाकार घेऊन मुख्याध्यापक गोवर्धन दांडगे,ममता गावित यांच्या सहकार्याने इच्छा तेथे मार्ग या म्हणीप्रमाणे लोकवर्गणीतून शाळेसाठी कायमस्वरूपी गावठाण फिडर ची लाईन मिळविली.जि.प.शाळा चारबन ही गावापासून अंतरावर एका टेकडीवर असल्याने शाळेत गावठाण फिडर ची लाईन उपलब्ध करणे आवाहनात्मक होते परंतु शिक्षकांनी पुढाकार घेऊन निलेश पाटील यांचे कडून शाळेसाठी 5 विद्युत खांब व सर्व तांत्रिक बाबी विनामूल्य मिळविल्या,ग्रा.पं.उमापूर ने केबल व मजुरी दिली, चारबन चे मुखीया उदयसिंग पटेल यांनी त्यांच्या शेतातील उभ्या पिकातून शाळेसाठी विद्युत खांब उभे करण्याची परवानगी दिली,सयाराम कनाशा चारबन यांनी जी.आय.तार व इन्सुलेटर दिले,चारबन गावकऱ्यांनी श्रमदानातून लाईन ओढून दिली.अशाप्रकारे शिक्षकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून शाळेसाठी कायम स्वरूपी विद्युत पुरवठा उपलब्ध करून घेतला. शनिवार व रविवार सुटी असून सुद्धा शाळेत लाईन येणार म्हणून शिक्षकांसह विद्यार्थी शाळेत हजर होते.शाळेतील टीव्ही सुरू झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अलौकिक हास्य फुलले होते.आदिवासी दुर्गम भागातील शाळेसाठी डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने विद्युत वितरण,पंचायत समिती जळगांव,ग्रामपंचायत उमापूर व चारबन गावकऱ्यांचे शाळा प्रशासनाच्या वतीने उपक्रमशील शिक्षक दिपक उमाळे यांनी आभार मानले.
लोकसहभागातून मिळविला शाळेसाठी कायमस्वरूपी विद्युत प्रवाह...शिक्षकांच्या प्रयत्नांना यश..
जळगांव जा.प्रतिनिधी:-
