फाळेगाव ते कुंभी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून हा रस्ता शेवटच्या घटका मोजत असून जनतेचा जीवनमरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अमर भेंडेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे त्याला जनतेचे पूर्ण सहकार्य असून हा प्रश्न त्वरित निकाली काढण्यात यावा अशी मागणी होत आहे.फळेगाव फाटा ते कुंभी रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी या भागातील जागृत नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलन केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग वेळ काढू पण करीत आहे या रस्त्याची चाळण झाल्यामुळे अनेकांचे अपघात झाले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे काही देणे घेणे नाही गेल्या एक वर्षापासून या भागातील जागृत बेशर्मीचे झाडे लावून आंदोलन केलें रास्ता रोको आंदोलन केले अशा विविध प्रकारे आंदोलने केली परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरूळपीर व वाशिम यांनी आंदोलन कर्ते दाऊद खान विष्णू फड मुक्तार सागर साकीर शेख संदीप पुंडलिक ठाकरे डॉक्टर भगवान भेंडेकर डॉक्टर नागोराव भेंडेकर दिलीप भेंडेकर विठ्ठल भेंडेकर यांना एक महिन्याच्या आत रस्ता दुरुस्ती चे काम होईल असे लेखी आश्वासन दिले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्याप पर्यंत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही हा रस्ता दुरुस्तीसाठी शासनाकडून पाच कोटी निधी मंजूर झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मंगरूळपीर व वाशिम हे वेळ काढून पणा करीत आहेत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून त्या रस्त्यावर शिवनी द. आसेगाव पिंपळगाव कुंभी नांदगाव हे गावी येत असून या गावातील जनतेला आपले काम करण्यासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागत आहेत तसेच मोलमजुरी करण्यासाठी या भागातील मजूर दुचाकीने शहराच्या ठिकाणी जातात परंतू बाहेरगावी गेलेले मजूर रात्रीच्या वेळी जोपर्यंत घरी परत येत नाही तोपर्यंत घरातील कुटुंबाचा जीव मुठीत असतो अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे हा रस्ता अपघातात निमंत्रण देणारा ठरत असून अनेक वेळा या रस्त्याने अपघात झाले आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.पुन्हा या रस्त्याचे काम त्वरित करण्यासाठी या भागातील शिवनी दलेलपूर येथील अमर विठ्ठल भेंडेकर हे गेल्या चार दिवसापासून फाळेगाव फाट्यावरआमरण उपोषणास बसलेला आहे दिवसें दिवस त्यांची तब्येत खालावत आहे परंतु अद्याप सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी त्यांच्या उपोषणाकडे लक्ष दिलें नाही तरी त्या रस्त्याचा प्रश्न त्वरित सोडउन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील फाळेगाव ते कुंभी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अमर भेंडेकर यांचे आमरण उपोषण...
विश्वास कुटे / वाशिम जिल्हा प्रतिनिधी...
