केंद्रीय काँग्रेस नेते खासदार मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्याकडून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे यामध्ये जिल्ह्यातील जुने तळागाळातील निष्ठावंत काँग्रेस नेते तसेच कार्यकर्ते यांचा घरी जाऊन सन्मान करण्याचा कार्यक्रम यावेळी घेण्यात आला.जिल्ह्यातील सर्वात दूर जुन्या काळात माजी खासदार स्वर्गीय बाळकृष्ण जी वासनिक तदनंतर मुकुलजी वासनिक यांच्यासोबत अतिशय निष्ठेने काम केल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या वतीने सन्मान व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रवेश काँग्रेस सचिव धनंजय देशमुख यांनी उपक्रम राबवला असून प्रामाणिक कार्यकर्ता पक्षाची ताकद असतो हे त्याच्या सन्मान सर्वांनी करणे किती आवश्यक आहे या उपक्रमातून दिसून येते.या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता सुजातपूर येथील माजी खासदार स्व बाळकृष्णजी वासनिक आदरणीय सुमनताई वासनिक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून माल्यार्पण व अभिवादन करून झाली या कार्यक्रमानंतर प्रदेश काँग्रेस कमिटी महाराष्ट्राच्या वतीन धनंजय देशमुख यांच्याकडून ज्येष्ठ नेता कार्यकर्ते यांना त्यांच्या घरी शाल सुताचा हार व फोटो देण्यात आला यामध्ये यावेळी धनंजय देशमुख यांच्या सोबत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक पंजाबरावदादा देशमुख युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जयस्वाल, बुलढाना जिल्हा युवक काँग्रेस प्रवक्ता संभाजी शिर्के,कॉन्ग्रेस कार्यकर्ते मो वसीम, विनायक देशमुख यांच्यासह शिष्टमंडळाने ज्येष्ठ काँग्रेस नेत्या माजी आमदार मा श्रीमती श्रद्धाताई टापरे ,मा श्री राजधर राजपूत पिंपळगाव काळे,मा श्री वा रा पिसे बावनबीर, मा श्री खालीक देशमुख जळगाव जामोद,मा श्री शालिग्राम हागे बावनबीर मा श्री अँड शालिकराम कळसकर नांदुरा,मा श्री त्रिलोकचंद चवरे मलकापूर ,मा श्री रशीदखा जमादार मलकापूर मा श्री मुक्त्यारसिंग राजपूत खेडी पान्हेरा ता मोताळा, मा श्री जनार्दन गावंडे पाटील नांदुरा श्रीमती सुमनताई दिनेशराव इंगळे मलकापूर ह्या नेत्यांना सन्मान केला.
काँग्रेस चे केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सचिव धनंजय देशमुख यांच्याकडून जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान उपक्रम...
सुरज देशमुख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
