उद्धव ठाकरे नामर्द आमदारांचे वक्तव्य.कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल....


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने आमदार रवी राणा यांनी कृष्ण जन्मोत्सव निमित्त दहीहंडी कार्यक्रम अंजनगाव सुर्जी येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नागरिकांच्या मनोरंजनासाठी रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे व अभिनेत्री अमिषा पटेल यांना या कार्यक्रमाला आमंत्रित केले होते. व दोन्ही अभिनेते मुंबईवरून अंजनगाव सुरजी येथे दाखल झाले. या अभिनेत्यांना बघण्यासाठी लाखो नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अंजनगाव पोलिसांनी चोक बंदोबस्त केला होता. दोन्ही अभिनेत्यांना बघून अंजनगाव नगरी आनंदाने गहिवरली. या तमाम नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी अंजनगाव पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.कार्यक्रम संपून आमदार रवी राणा अंजनगाव वरून अमरावतीकडे निघाले असता अंजनगाव सुर्जी अग्रेसन चौकामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख महेंद्र दिपटे व आमदार रवी राणा यांच्यात वाद झाला. हा वाद पिकोपाला जाऊन हाणामारीत झाला. सदर युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते महेंद्र दिपटे यांच्यावर तुटून पडलेत व जबर मारहाण केली. असे महेंद्र दीपटे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आमदार रवी राणा यांनी अपशब्द वापरल्यावरुन सदर वाद झाल्याचे समजते. वाद होताच तात्काळ अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार घटनास्थळावर दाखल झाले. व परिस्थिती आटोक्यात आणली. दोन्ही बाजूच्या तक्रारीवरून महेंद्र दिपटे यांच्यावर कलम 294, 323, 506, नुसार गुन्हे तर युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते मंगेश कोकाटे, अजय देशमुख, विठ्ठल ढोले, यांच्याविरुद्ध भादवी कलम 294, 323, 506, 34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेची संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेचा संपूर्ण तपास अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार दीपक वानखडे करत आहेत.

Previous Post Next Post