गट ग्रामपंचायत जांब मध्ये नालीचे कामे निकृष्ट दर्जेचे तर संबंधित अधिकारी घेत आहेत फक्त बघण्याची भूमिका तर अधिकाऱ्याचे चौकशीकडे कानाडोळा ठेकेदार मस्त जनता त्रस्त...


वाशीम जिल्हा प्रतिनिधी:-विश्वास कुटे...

मंगरूळपीर शहरातील गट ग्रामपंचायत जांब येथील काही दिवसा पूर्वी जनतेच्या समस्ये बाबत विविध प्रसार माध्यमांना बातम्यांची झळ लागताच प्रशासनाला याची कळ लागली व परिणामी जांब शहापुर आणि जांब रोड लगत नालीचे व रोडचे कामे युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले, मात्र जांब रोड लगत करण्यात आलेल्या नालीचे काम हे शेड्युल बी नुसार असून ४ लाख ३ हजार रुपयांचे असून सदर सुरू करण्यात आलेले नालीचे काम हे अर्धवट करून ३ लाख ३२ हजार ६२९ रुपयात पूर्णत्वावर नेले आहे, या नालीचे काम सुरू करण्यात आले त्या वेळेस कामाचे कुठलेही अंदाज फलक लावण्यात आले नाही, या कामात संबंधित ठेकेदाराने माती मिश्रित डस्टचा वापर वापर केला आहे. एवढेच नव्हे तर सिमेंट देखील निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहे, या बाबत अभियंता गाडगे यांच्याशी भ्रमण ध्वनीद्वारे विचारणा केली असता त्यांनी देखील उडवावी चे उत्तरे दिले व या कामात घोटाळा झाल्याचे समजले म्हणून या संपूर्ण प्रकरणा बाबत सखोल चौकशी व्हावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक विकास जी दाभाडे यांनी आज अकरा सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी वसुमना पंत मॅडम यांना तक्रार अर्ज सादर केला या अर्जात त्यांनी संबंधित कामाबाबत सखोल चौकशी करूनच संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करण्यात यावे, तसेच अभियंता सागर घाडगे यांच्या विरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे तक्रार अर्जात नमूद केले आहे, यावर जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी वसुमना पंत मॅडम कुठली कारवाई करण्याचे आदेश देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Previous Post Next Post