चिखलदरा येथील जन सवांद यात्रेत आदिवासी बंधू भगिनीवर अन्याय करणाऱ्या भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवा...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

देशाचे लचके तोडणाऱ्या आणि आदिवासी बांधवांवर अन्याय करणाऱ्या भाजपा सरकारला घरचा रस्ता दाखवा असे प्रतिपादन अमरावती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख यांनी मेळघाटातील चुरणी येथिल जाहीर सभेत केले. याप्रसंगी आ. बळवंत वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हात ७ सप्टेंबर पासून जनसंवाद यात्रेला प्रारंभ झाला असुन ही यात्रा आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाच तालुक्यातील पदयात्रेनतर सोमवारी मेळघाटात जनसंवाद मात्रेने आगमन केले. येथे चिखलदरा येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. तर चुरणी येथे यात्रेचा समारोप करण्यात आले. यावेळी सभेतुन जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासनाविरोधात फटके बाजी केली. ते म्हणाले मेळघाटातील आदिवासी बांधवांना उज्वला गॅसच्या नावावर फसवणूक करुन त्यांना गॅस कनेक्शन दिले पण गॅस भरण्याची तरतूद केली नाही. पंधरा लाख रुपये खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले पंरतु एक रुपयाही खात्यात जमा झालेला नाही. दोन कोटी बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. देशातील महागाई दुर करु असे आश्वासन दिले होते परंतु एकाही आश्वासनाची पूर्तता या  नऊ वर्षात झाली नसल्याने देशात भाजपा विरोधी लाट पसरलेली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपालाधडका शिकवाच असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.तसेच एक महिन्यापासून पावसाने दांडी मारली होती या दांडी मुळे कास्तकार बांधवांचे पिक नष्ट झाले असल्याने मेळघाटात दुष्काळ जाहीर करण्यात यावे असे निवेदन चिखलदरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.तसेच या जन संवाद यात्रेमध्ये शेकडो कार्यकर्त्याचा सहभाग होता. जनसंवाद पदयात्रेत काॅगेस चे माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे, आरोग्य सभापती बाळासाहेब हिगणेकर, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गैलवार, पुजा राहुल येवले, चिखलदरा अचलपूर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष सहदेव बेलकर, नामदेवराव तनपुरे, चिखलदरा शहर अध्यक्ष जाहीर भाई, संजय लायदे सर, राजेश मागलेकर, गिरीश कराळे, प्रदीप देशमुख, किशोर देशमुख, संजय बेलकर, किशोर देशमुख, राहुल येवले, अमरावती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष  पंकज मोरे,उपाध्यक्ष यशवंत काळे, अरविंद तेलगोटे, प्रदीप देशमुख, विनोद पवार, सिध्दार्थ बोबडे, मेळघाट युवक काँग्रेस अध्यक्ष पियुष मालविय, राम चव्हाण, रामगोपाल मावस्कर,शेख मुख्तार शेख, विलास बोरेकर किशोर झाडखंडे सर्व जिल्हा काँग्रेस चे कार्यकर्ते व तळागाळातील सर्वसामान्य जनता या पदयात्रेत सहभागी झाले होते.देशात आणि राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची सरसकट पायमल्ली होत आहे. गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. सत्तेचा माज या सरकारांना चढलेला आहे. हा माज उतरवणे जनतेला आवश्यक झाले असुन संपूर्ण भारतात काॅगेसची लाट पसरली आहे. अशा या संविधानाची पायमल्ली करणाऱ्या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा इशारा आमदार बळवंतराव वानखडे यांनी दिला आहे.

Previous Post Next Post