सुनगाव शेतशिवारातील घरातुन चोरट्याने केला 28 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी..हॉटेलमध्ये नाश्ता करतांना पोलिसांनी केले चोरट्याला जेरबंद...


उपसंपादक-गणेश भड....... 

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सुनगाव येथील शेत शिवारात दिनांक 11 सप्टेंबर रोजी 28 हजार रुपयांच्या मुद्देमालाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे याविषयी सुकलाल नरसिंग मोरे यांच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे फिर्यादी सुकलाल मोरे हे सुनगाव येथील शेत शिवारात राहतात दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी शारदा ही कामे करण्यासाठी उठली असता तिला घराच्या मागच्या खोलीत पेटी दिसली नाही त्यामुळे तिने वडिलांना ही गोष्ट सांगितली वडिलांनी आजूबाजूला पाहिले असता एक सरळ पातळ इसम हा पेटी घेऊन पळत जाताना दिसला त्यांचा त्यांनी पाठलाग केला सदर व्यक्ती हा गोराळा धरणावरील राहणारा मानसिंग नानसिंग भैयद्या असल्याचे त्यांनी ओळखले सकाळी 8 वाजताच्या सुमारास सूनगाव येथील नागरिकांनी मानसिंग भयड्या याला पकडले सदर आरोपीने फिर्यादीच्या घरून 350 ग्रॅम चांदी किंमत 20 हजार रुपये व नगदी रोख रक्कम 8हजार रुपये एकूण 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केलेला आहे पोलिसांनी लगेच तपास चक्रे फिरवून आरोपीला अटक केली आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 380 भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस कॉन्स्टेबल इरफान शेख हे करीत आहे.

Previous Post Next Post