किसनराव तायडे गुरुजी यांचे स्मरणार्थ वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट...


 
किसनराव तायडे गुरुजी यांचे स्मरणार्थ वाचनालयाला स्पर्धा परीक्षा पुस्तकांची भेट...

जळगाव जामोद प्रतिनिधी-

स्थानिक सार्वजनिक वाचनालयात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिवंगत किसनराव सोनाजी तायडे गुरुजी यांचे स्मरणार्थ स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची भेट दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी देण्यात आली. संपूर्ण आयुष्यभर दिवंगत तायडे गुरुजी यांनी ज्ञानदान करून माझा विद्यार्थी हा प्रशासकीय सेवेत अधिकारी दिसावा हे स्वप्न ठेवले होते त्यांना स्मरूनच तायडे गुरुजी यांच्या कुटुंबीयांनी स्पर्धा परीक्षेची पुस्तके विद्यार्थ्यांना भेट दिलीत.. याप्रसंगी त्यांच्या पत्नी रुक्मिणी बाई तायडे, मुलगा दादाराव तायडे, संतोष तायडे, राजाभाऊ कोकाटे, मुलगी हिरकणी बडगे,शिला चराटे,विद्या चापके,रोशन चापके,कोमल बडगे, ग्रंथपाल अरुण राऊत, सिध्दार्थ पारवे, गौरव रणित, श्रावण हातेकर, आदित्य जाधव,अक्षय भगत, संकेत गुरुदेव, अभिजित चापके आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post Next Post