स्वातीताई वाकेकर यांचे प्रचारार्थ आदिवासी ग्राम चारबन येथे सभा संपन्न...मध्यप्रदेश सेंधवा विधानसभेचे आमदार मोंटुदादा सोळंकी यांनी यांनी केले मार्गदर्शन..


 
स्वातीताई वाकेकर यांचे प्रचारार्थ आदिवासी ग्राम चारबन येथे सभा संपन्न...मध्यप्रदेश सेंधवा विधानसभेचे आमदार मोंटुदादा सोळंकी यांनी यांनी केले मार्गदर्शन..
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी....

महाविकास आघाडीच्या उमेदवार स्वाती ते वाकेकर यांच्या प्रचारासाठी बिरसा मुंडा जयंती निमित्त सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चारबन येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते...प्रचार सभेला संबोधित करताना मोंटू दादा सोडून की यांनी सांगितले की, तुम्ही आदिवासी इथले मूळ रहिवासी आहात. जल जमीन जंगल यावर तुमचाच अधिकार आहे... या भागात अजूनही आदिवासी समाज हलाखीचे जीवन जगत असून त्यांचा कुठलाच विकास या भागात झाला नाही. आपल्या सर्वांगीण विकासासाठी व आपल्या भविष्यासाठी आपण महाविकास आघाडीचा उमेदवार स्वातीताई वाकेकर यांना मतदान करून त्यांना विजयी करायचा आहे....यावेळी हर्षवर्धन सपकाळ, गजानन भाऊ वाघ, भिमराव पाटील,यांनी सुद्धा स्वातीताई लानिवडून आणण्यासाठी आपण सर्व आदिवासी बांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे. या आदिवासी भागात अजूनही आरोग्य रस्ते या सुविधांचा अभाव असून हे सर्व बदलण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य वाकेकर यांनाच आमदार करायचा आहे असे सांगितले...

     
बिरसा मुंडा जयंती निमित्त १६ नोव्हेंबर रोजी चारबन येथे आदिवासीची भव्य सभा पार झाली...
  
    सातपुड्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या या  आदिवासी बांधवांच्या अनेक प्रश्नांना युवा कार्यकर्त्यांनी यावेळेस वाचा फोडली पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा जाण्याचा रस्ता असेल अशा मूलभूत सुविधांपासून आजही  आमचे अनेक बांधव त्या ठिकाणी वंचित आहेत त्यामुळे आजच्या सभेतून परिवर्तनाचा निर्धार या संपूर्ण बांधवांनी केला. 
    यावेळी उदयसिंग भैय्या पटेल , गोमालचे सरपंच जुमान सिंगभाऊ, उमेश चंगड, देविदास डावर, राधेश्याम खरात, घट्टे  यांचेसह गोमाल,भिंगारा,उमापूर,हनवतखेड,गारपेठ,आदि भागातून मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिला व पुरुष दाखल झाले होते...

Previous Post Next Post