अबब... दहेन्द्री ग्रा.पं. मधून रोहयोच्या दहा विहिरी चोरीला !मेळघाटात म. ग्रा. रोहयो योजनेत चोर झाले सक्रिय...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
मेळघाट हा आदिवासीबहुल भाग असून आदिवासीच्या उत्थानासाठी व आदिवासींचे स्थलांतर थांबावे, याकरिता शासन मागेल त्याल्या काम व शेतकऱ्यांना मागेल त्याला विहीर, शेततळे व गुराचा गोठा देण्याची योजना सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात त्याच्या फायदासुद्धा मेळघाटातील लोकाना होत असून पन्नास टक्के निधी हा चोरांच्या घशात जात असल्याचे बरेच प्रकरण उजेडात आल्याने दिसून येत आहे. असाच प्रकार दहेन्द्री येथे उघडकीस आला. येथील ग्रा. पं. मधून रोहयोच्या तब्बल १० विहिरी चोरीला गेल्याचे प्रकरण उजेडात आले आहे.चिखलदरा तालुक्यातील दहेन्द्री येथे म.ग्रा. रोहये मधून शेतात दोन चार वर्षाअगोदर विहिरी बांधल्या होत्या. त्याच विहिरी पुन्हा त्याच योजनेंतर्गत मंजूर करून दाखविण्यात आल्या आहे. यासंदर्भात नाव व यादीच्या पुराव्यासह तक्रारकर्त्याने तक्रार दाखल केली आहे. आता शासनाला या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी समिती गठित करणे गरजेचे झाले आहे.एका ग्रा. प. मध्ये दहा ते बारा विहिरी चोरीला जातात तर अख्ख्या मेळघाटात किती, हे तर चौकशीअंतीच कळेल. एका विहिरीसाठी शासनाकडून साडेचार लाख रुपये मिळतात. यावरून १० विहिरीचे ४५ लाख रुपये हे काम न करताच काढण्यात येत आहे. या भ्रटाचारात एकटा तांत्रिक सहायक किवा रोजगार सेवक असू शकत नाही, तर त्याच्या चोरीला साथ देणारा तो झारीतला शुक्राचार्य कोण, याचा शोध घेणे गरजेचे आहे.
