27 वर्षीय विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या...ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण...


 
27 वर्षीय विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या...ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील लखाड येथे सकाळच्या सुमारास 27 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली. विवाहितेने आपल्या राहत्या घरात कौटुंबिक त्रासामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले. घरातील लोकांनी गळफासाची दोरी कापून ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुरजी येथे आणले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरच्या लोकांना होताच त्यांनी तात्काळ अंजनगाव सुर्जी ग्रामीण रुग्णालय गाठले. विवाहितेचे शेव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृत्यदेह आम्ही ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतकाच्या नातेवाईकांनी घेतली. माझ्या मुलीला गेल्या पाच सहा वर्षांपासून कौटुंबिक त्रास होता, नेहमी तिला पैशाचा तगादा लावत असून तिला पती, सासू, सासरे यांनी गळफास दिला. असा आरोप विवाहितेच्या आईने केला आहे. यामुळे ग्रामीण रुग्णालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी तात्काळ ॲक्शन घेऊन आरोपींना ताब्यात घेतले. तेव्हा मृतकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांच्या चोक बंदोबस्त मध्ये लखाड येथे अंतिम संस्कार करण्यात आला. अर्चना प्रमोद लबडे वय 27 वर्ष, असे मृत महिलेचे नाव असून तिला पाच वर्षाचा मुलगा, व नऊ वर्षाची मुलगी आहे. या घटनेचा पुढील तपास अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश अहिरे व अंजनगाव पोलीस करत आहेत.

Previous Post Next Post