नगरपरिषद करणार १० मार्चपासून थकबाकीदारांच्या मालमत्ता वर जप्तीची कारवाई...


 
नगरपरिषद करणार १० मार्चपासून थकबाकीदारांच्या मालमत्ता वर जप्तीची कारवाई...

अनिल भगत/आर सी न्युज नेटवर्क...

जळगाव जामोद नगरपरिषद क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदार मालमत्ता धारकांनी विरोधात नगरपालिका प्रशासन कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत सध्या तरी दिसत आहे. नगरपरिषद मुख्याधिकारी डॉक्टर जाधव यांनी आरसी २४ न्यूज शी बोलताना सांगितले की दिनांक १० मार्चपासून जळगाव जामोद शहरातील नगरपरिषद क्षेत्रामधील मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. नगरपरिषेकडील कर वसुली पथकांनी वेळोवेळी संबंधित मालमत्ताधारकांना भेट देऊन कर भरण्यासाठी सूचना दिल्या होत्या परंतु वारंवार दिलेला संधीकडे दुर्लक्ष करून काही थकबाकीदारांनी अद्यापही नगर परिषदेमध्ये आपल्या कराचा भरणा केलेला नाही. त्यामुळे या मोठ्या थकबाकीदारांवर नगरपरिषद प्रशासन दिनांक १० मार्चपासून जप्तीची कारवाई करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

•जप्तीच्या कारवाई संदर्भातील मुख्य बाबी...

नगरपरिषद प्रशासन १० मार्च २०२५ कारवाईची सुरुवात करणार आहे..

•कारवाईचा केंद्रबिंदू-नगरपालिका क्षेत्रातील सर्व मोठे थकबाकीदार यांना वारंवार सूचना मिळूनही कर भरणा केलेला नाही असे.

•मालमत्ता प्रकार- निवासी व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता असलेले मोठे थकबाकीदार...

•मालमत्ता जप्ती प्रक्रियेमधील पुढील टप्पा- मोठ्या मालमत्ता जप्तीनंतर  लिलावाद्वारे नगरपरिषद प्रशासन थकबाकी वसूल करणे प्रक्रिया करणार आहे. 

•नगरपरिषद प्रशासनाची थकबाकीदारांसाठी अंतिम संधी..

जळगाव जामोद नगरपरिषद प्रशासनाने मोठ्या थाकाबाकीदारांना मालमत्ता कर भरण्याची एक संधी उपलब्ध केली आहे ज्या मोठा थकबाकीदारांच्या मालमत्ता कर अद्याप भरलेला नाही त्यांनी दिनांक ९ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण थकबाकी नगरपरिषदेमध्ये जाऊन भरावी. असे न केल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता थेट जप्तीची कारवाई करण्यात येईल असा इशारा नगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात आला.

•नगरपरिषदेचे नागरिकांना आवाहन...

जळगाव जामोद शहराच्या विकासासाठी तसेच सर्व नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी कर भरणा अत्यंत महत्त्वाचा असून समस्त नागरिकांनी नियमित कर भरावा नियमित कर न‌ भरल्यास आपणास नागरी सुविधा पुरविण्यात अडचणी येतात त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी व सुविधांमध्ये अडचणी निर्माण होऊ नये याकरिता त्वरित कराचा भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी डॉक्टर सुरज जाधव यांनी केले आहे.

Previous Post Next Post