चिखलदरा तालुक्यातील खोंगडा गावाजवळील घटना...वाघाच्या हल्ल्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
चिखलदरा तालुक्यातील केली येथील युवक विनोद छोटेलाल चिमटे (वय २५) याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना खोंगडा गावाजवळ रात्री घडली.सविस्तर माहितीनुसार, विनोद चिमटे हे जांभळी येथील आठवडी बाजारात मासे विक्रीसाठी गेले होते. रात्री उशिरा दुचाकीने परत येत असताना खोंगडा गावाच्या पुढे वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. वाघाने त्यांना ओढत जंगलात नेले आणि अर्धवट भक्ष्य केले. सकाळी मार्गावरील लोकांना घटनास्थळी रक्ताच्या खुणा व शाईन दुचाकी आढळून आली.संशय आल्याने त्यांनी खोंगडा गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर चिखलदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला.या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. मेळघाट भाजप युवा मोर्चाचे संयोजक यशवंत केवलराम काळे व त्यांचे सहकारीही घटनास्थळी उपस्थित होते.
