मथुरा लॉन येथे "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" या थीमसह योगा दिन साजरा...योग म्हणजे सुदृढ मन व निरोगी शरीराची गुरुकिल्ली..! आ. डॉ. कुटे...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
॥ आरोग्यम् परमम् भाग्यम्, स्वास्थ्यम् सर्वार्थ साधनम् ॥
योग म्हणजे सुदृढ मन व निरोगी शरीराची गुरुकिल्ली. योग संस्कृतीचे महत्त्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी संपूर्ण विश्वाला पटवून दिले आहे.असे प्रतिपादन माजी मंत्री तथा कर्मयोद्धा आ. डॉ. संजयभाऊ कुटे यांनी केले. दिनांक २१ जून २०२५ रोजी ११ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त आमदार डॉक्टर संजय कुटे उपस्थित राहून शेगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मथुरा लॉन येथे साजरा केला . शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग अत्यंत महत्त्वाचा आहे. योगाचे हे महत्त्व पटवून देण्यासाठी यंदाच्या योगदिनाची संकल्पना 'मानवतेसाठी योग ही आहे. फक्तं आजच्या दिवसापूरते नव्हे तर आपल्या उत्तम आरोग्यासाठी नियमित योग करण्याचा संकल्प करूया. योग, एक परिवर्तनकारी साधना, मन आणि शरीराच्या सुसंवादाचे, विचार आणि कृतीमधील संतुलनाचे आणि संयम आणि तृप्तीचे एकतेचे प्रतिनिधित्व करते. ते शरीर, मन, आत्मा आणि आत्मा यांना एकत्रित करते, आरोग्य आणि कल्याणासाठी एक समग्र दृष्टिकोन देते जे आपल्या धावपळीच्या जीवनात शांती आणते.११ डिसेंबर २०१४ रोजी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून, जगभरातील लाखो लोक, योगाच्या अभ्यासाने एकत्रित होऊन, दरवर्षी हा दिवस साजरा करतात. हा जागतिक उत्सव एकता आणि सौहार्द वाढवतो, सीमा आणि संस्कृती ओलांडतो आणि आपल्याला शांती आणि कल्याणाच्या जगाच्या जवळ आणतो परिवर्तनाची त्याची शक्ती हीच आपण या खास दिवशी साजरी करतो असे आ. डॉ. संजयभाऊ कुटे यांनी सांगितले.या प्रसंगी आ. डॉ. संजय कुटे यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना आरोग्यसंपन्न शुभेच्छा.