सिद्धिविनायक सायन्स अॅकॅडमीत English speaking batch 2025 सेंड-ऑफ आणि बक्षीस वितरण समारंभ...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
सिद्धिविनायक सायन्स अॅकॅडमी, जळगाव जामोद येथे दिनांक 23 जून 2025 English speaking batch 2025 वर्गाचा सेंड-ऑफ आणि बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. या खास कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत निचल सर (पोलीस निरीक्षक, जळगाव जामोद) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. तसेच प्रा. निलेश वाघमारे, प्रा. गोपाल गायकी, प्रा. अविनाश देशमुख, प्रा. अजय वानखेडे, प्रा. रवी बोंबटकर, Vaibhav Gavande sir आणि प्रा. विक्रांत डोबे यांचीही उपस्थिती होती.संपूर्ण कार्यक्रम सिद्धिविनायक सायन्स अॅकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रा. विक्रांत डोबे सर यांनी पुष्पगुच्छ देऊन केले आणि त्यांनीच संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदनही केले.आपल्या प्रेरणादायी भाषणात श्रीकांत निचल सरांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे महत्त्व पटवून देताना, ही भाषा आजच्या स्पर्धात्मक युगात किती उपयुक्त आहे, हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे आणि भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचे मार्गदर्शन केले.यानंतर प्रा. निलेश वाघमारे सरांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि ट्रॉफीज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला आणि विद्यार्थ्यांच्या मनात नवीन जोम व आत्मविश्वास निर्माण झाला.