बुलढाणा जिल्हा(प्रतिनिधी):
स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज जबरदस्त योद्धे 9 वर्षाच्या कारकिर्दीत औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्धी, इंग्रज यांच्याशी सतत लढले. एक ही युद्ध न हरले नाहीत असे आमचे महान दैवत छत्रपती संभाजी महाराज 14 में यांच्या जयंती निमित्त एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन कडून गरीब गरजू रुग्णांना बेड टू बेड रक्तदान करून साजरी. छत्रपती संभाजी राजे यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवुन एकनिष्ठा रक्तदात्यांनी भर उन्हाळ्यात 45 डिग्री उन्हाचा पारा असल्यावर ही 21 रक्तदात्यांनी आपला रक्तदान करून रुग्णाला जिवनदान दिले. यावेळी एकनिष्ठा रक्तसम्राट हितेश आयलाणी, श्रीकृष्ण ढोले, गजानन मुळतकर, विशाल शेटे, गजानन पहूरकर, प्रशांत टिकार, दिपक रेडे, निलेश भोसले, आकाश हातमोडे, गौरव कवटेकर, भुषण महाले, संतोष पिवाल, अमित नागवानी, निलेश झुनझूनवाला, राम आखाडे, विशाल भवर, रविंद्र बोन्द्रे, मनिष रूपाणी, अमोल टिकार यांच्यासह आणखी दोन गोपनीय रक्तदात्यांनी रक्तदान स्वराज्यरक्षक शंभु राजे यांची जयंती साजरी केली. रक्तमित्र सुरजभैय्या यादव, भागवत पाटील, प्रतिक ताठे, मोहन देशमुख,कैलास दनके, प्रदीप शमी, हर्षल इंगळे, गणेश दही यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. शासकीय रक्तपेढीचे बिटीओ सौ. देशमुख, टेक्निशियन अली सर, मेघा इंगळे, परिचारिका भारती काळे, कु. रेश्मा वावगे आदिचे सहकार्य लाभले अशी माहिती एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन तालुका संयोजक कैलास दनके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
