जळगाव जामोद (प्रतिनिधी);
सी.एस.सी. (CSC) व महा ई-सेवा केंद्राच्या वतीने 'सी.एस.सी. पे योग' (CSC Pe Yoga) उपक्रमांतर्गत जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील संत रूपलाल महाराज नगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक श्री हनुमान मंदिर परिसरात आयोजित या योग शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शिबिराचे दोन स्वतंत्र गटांत आयोजन करण्यात आले होते.या सत्रात ३० पेक्षा अधिक महिला व विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग नोंदविला.रेखा नवरतन भुते यांनी त्यांना विविध योगासने व प्राणायामाचे सखोल मार्गदर्शन केले.या सत्रात २८ युवक सहभागी झाले. विनायक भगत व प्रतीक राऊत यांनी युवकांना योग प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या आयुष्यात योगाचे महत्त्व विशद केले."योग केवळ व्यायामाचा प्रकार नसून ती एक जीवनपद्धती आहे. नियमित योगाभ्यासाने शारीरिक आरोग्य सुधारते, मानसिक तणाव कमी होतो आणि एक आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते," असा मोलाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.सी.एस.सी. व्ही.एल.ई. (CSC VLE) अक्षय गजानन पाटील आणि सेतु संचालक सुनील भगत यांच्या पुढाकाराने व परिसरातील नागरिक आणि युवकांच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वी झाले. या उपक्रमात एकूण ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांच्या वतीने उपस्थित सर्व महिला, युवक, विद्यार्थी व नागरिकांचे आभार मानण्यात आले.
