शिवसेनेत वसंत मिरगे यांच्यावर मोठी जबाबदारी; प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्ती...


 शिवसेनेत वसंत मिरगे यांच्यावर मोठी जबाबदारी; प्रभारी तालुका प्रमुखपदी नियुक्ती...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी : 

शिवसेना पक्षाने संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसैनिक वसंत उत्तमराव मिरगे यांची प्रभारी तालुका प्रमुख (कार्यक्षेत्र – जळगाव जामोद तालुका) पदावर नियुक्ती केली आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षवाढीसाठी सक्रिय कार्य करण्याच्या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय भास्करराव मोरे यांनी नियुक्तीपत्र प्रदान केले.नियुक्तीपत्रात नमूद केल्यानुसार, ही नियुक्ती पक्षांतर्गत पुढील निवडणुकांपर्यंत लागू राहणार असून पक्ष संघटन मजबूत करणे, हिंदुत्वाचा विचार जनतेपर्यंत पोहोचवणे तसेच कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षवाढीसाठी कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे जळगाव जामोद तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. वसंत फिरंगे यांच्या नियुक्तीबद्दल शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे."जय हिंद! जय महाराष्ट्र!" या घोषणेसह नियुक्तीपत्राद्वारे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous Post Next Post