मोहरम निमित्त अकोट ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च...


 मोहरम निमित्त अकोट ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च...

सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी...

अकोट तालुक्यात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांकडून शहर व परिसरात रूट मार्च काढण्यात आला.पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या रूट मार्चद्वारे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यात आली. मोहरम सण शांतता, सौहार्द आणि बंधुत्वाच्या वातावरणात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे.रूट मार्चदरम्यान प्रमुख मार्ग, संवेदनशील भाग तसेच धार्मिक स्थळांच्या परिसराची पाहणी करण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले.मोहरम उत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व धर्मीय नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अकोट ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post Next Post