अयोध्येतील दान चोरीच्या घटनेचा निषेध: वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांकडून महाआरती...


 अयोध्येतील दान चोरीच्या घटनेचा निषेध: वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात शिवसैनिकांकडून महाआरती...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी;

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील चोरीची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संग्रामपूर तालुक्याच्या वतीने वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे, ज्या दिवशी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन झाले, त्याच दिवशी वरवट बकाल येथील श्रीराम मंदिराच्या उभारणीला लोकवर्गणीतून सुरुवात झाली होती. आजही हे मंदिर पूर्णपणे पारदर्शक कारभाराचे उत्तम उदाहरण ठरले आहे. भाविकांनी श्रद्धेने दिलेले दान येथील श्रीराम मंदिराच्या कार्यात अत्यंत चोखपणे आणि योग्य कारणासाठी वापरले जात असल्याने ग्रामस्थांमध्ये एक प्रकारचे समाधान आणि विश्वासाचे वातावरण आहे.या महाआरती प्रसंगी शिवसेनेच्या उपनेत्या जयश्रीताई शेळके, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, युवासेना जिल्हाप्रमुख शुभम पाटील, विधानसभा संघटक भीमराव पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र झाडोकार, उपतालुकाप्रमुख विजय मारोडे, तालुका संघटक राहुल मेटांगे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पंकज मिसाळ, युवासेना विधानसभा संघटक अजय घिवे, युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत इंगळे,उपतालुकाप्रमुख डॉ. श्रीराम दाभाडे यांच्यासह पळशी झाशीच्या सरपंच प्रियंकाताई मेटांगे, पुष्पाताई वाघ, शाखा प्रमुख प्रल्हाद अस्वार, निलेश झाडोकार, सरपंच रामेश्वर खंडेराव, अमोल बकाल, मनोज बकाल, मनोजभाऊ वाघ तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post