बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी;
शहरातील सतिफैल परिसरातील धार्मिक व सामाजिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे. सेवा भावी निस्वार्थी श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा यांच्या संकल्पनेतून मागील २६ वर्षा पासून भजनी मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम निस्वार्थ पणे " मुख मे हो राम नाम राम सेवा हाथ " मे हे ध्येय घेऊन वर्ष भर विविध उपक्रम राबविले जातात या मध्ये पुथपाथ वरील गोर गरीब लोकांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट व गरम कपडे वाटप. पक्ष्यांची उन्हाळ्याच्या दिवसात पाण्या साठी होणारी भटकंती पाहता जल पात्र वाटप. सामान्य रूग्णालयात पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान. दिवाळीला गोर गरिब लोकांना मिठाई व कपडे वाटप.स्वच्छता अभियान .वृक्षारोपण राष्ट्रीय महापुरषांच्या जयंत्या. गुरुपौर्णिमा उत्सव. दत्तजयंती. रामनवमी. महाशिवरात्री असे अनेक उपक्रम वर्ष भर राबविले जातात या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जात असून देविदास शर्मा यांना इंडियन एक्सलेंन्स अवार्ड. भारत गौरव सर्वोच्च सम्मान पुरस्कार. महाराष्ट्र राज्य भुषण पुरस्कार. महाराष्ट्र राज्य बहुजन रत्न पुरस्कार. नॅशनल आयकॉन अवार्ड 2025. विश्वकर्मा समाज महाराष्ट्र रत्न पुरस्कार. छत्रपती शाहू महाराज जिवन गौरव पुरस्कार. खामगांव अभिमान पुरस्कार असे अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराने संम्मानित झाले आहे. अनेक संस्था. मंडळे. राजकीय पदाधिकारी यांच्या वतीने सुद्धा देविदास शर्मा यांचा सत्कार झाला आहे या सर्व कार्याची दखल घेत मा. आमदार नानाभाऊ कोकरे यांच्या हस्ते देविदास उर्फ मुन्नाभाऊ शर्मा यांचा शाल.श्रीफळ व पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांनी सुध्दा देविदास शर्मा यांना शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी माजी आमदार नानाभाऊ कोकरे. सुरेश चोपडे.रामेश्वर घोंगे.सुपडसिंग खुर्दे.घुले सर आदी ची उपस्थीती होती
