जळगाव जामोद(प्रतिनिधी):
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुनगाव येथील २५ वर्षीय विवाहिता दिपाली अर्जुन पाटील ही महिला पुन्हा एकदा आपल्या राहत्या घरून कोणालाही काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. १ जुलै २०२६ रोजी पहाटे ३:०० ते ३:३० च्या दरम्यान दिपाली अर्जुन पाटील ही महिला घराबाहेर पडली. त्यानंतर त्या पुन्हा परतली नाही. ही महिला काही महिने अगोदर सुद्धा घरून बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती अर्जुन पाटील याने जळगाव जामोद पोलीस स्टेशनला केली होती.नंतर काही दिवसांनी ती पुन्हा परत आली व दिनांक एक जुलै रोजी पुन्हा एकदा घरून बेपत्ता झाली असून नातेवाईकांनी आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, परंतु त्या मिळून आल्या नाहीत. अखेर पती अर्जुन किसन पाटील यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार नोंदवली.सदर प्रकरणी जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग क्र. ६७/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, पुढील तपास ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकांत बावस्कर हे करत आहेत.बेपत्ता महिलेची ओळख दिपाली अर्जुन पाटील वय २५ वर्षे,रंग निमगोरा,उंची ५ फूट ५ इंच,बांधा मजबूत,केस लांब,वेशभूषा शेवटची दिसली तेव्हा अंगात साडी आणि ब्लाउज होता.वरील वर्णनाची महिला कोणालाही आढळल्यास किंवा तिच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास, कृपया त्वरित जळगाव जामोद पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
