सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी :
सत्र न्यायालय, अकोट येथील मा. न्या. बी. एम. पाटील यांनी स्पेशल केस क्र. 48/2023 मध्ये महत्त्वपूर्ण आदेश देत आरोपी सोनाजी सोनू अशोक आवसर्मोळ यास प्रकरणातून निर्दोष केले.सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 363, 366, 354(डी) तसेच पॉक्सो कायदा, कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणातील आरोपपत्र, उपलब्ध कागदपत्रे आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद विचारात घेतल्यानंतर न्यायालयाने डिस्चार्जचा आदेश दिला.या प्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने अँड. दिलशाद बानो नसरुल्लाह खान यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांनी प्रकरणातील तथ्ये, कायदेशीर तरतुदी आणि संबंधित न्यायनिवाड्यांच्या आधारे सविस्तर युक्तिवाद सादर केला. बचाव पक्षाच्या मांडणीची दखल घेत न्यायालयाने संबंधित आदेश पारित केला.या आदेशामुळे विधी क्षेत्रात अँड. दिलशाद बानो नसरुल्लाह खान यांच्या प्रभावी वकिलीची चर्चा होत आहे.
