अर्जुन खिरोडकार/हिवरखेड...
यावेळी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखणे, कायदा व नियमांचे पालन करणे, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनीक्षेपकाचा मर्यादित वापर, तसेच सामाजिक सलोखा कायम ठेवणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. गावातील गणेशोत्सव शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये समन्वय ठेवण्यावर यावेळी भर देण्यात आला.या बैठकीमुळे हिवरखेड येथील गणेशोत्सवाच्या नियोजनाला अधिक गती मिळाली असून, ‘उत्सव आनंदाचा, जबाबदारीने साजरा करण्याचा’ संदेश देण्यात आला.यावेळी उपस्थित विविध मान्यवरांतर्फे पोलीस अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच. गावातील गणमान्य व्यक्ती पत्रकार बंधू पोलीस पाटील गणेश मंडळाचे पदाधिकारी, विविध धर्माचे नागरिक यांनी आपापली मनोगत व्यक्त केली. त्यांना पोलीस अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिल्यामुळे गणेश मंडळ आणि पोलिसांमधील समन्वय पाहता गणेशोत्सव मिरवणूक शांततेत पार पडेल असे आश्वासन सर्वांनी दिले.

