चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल हतरु व चुरनी या सर्कलचा गावातील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दि. 21/3/2021 रोजी अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांनी अचानक दौरा केला असता या दौऱ्या दरम्यान येथिल आदिवासी बांधवांचे समस्या जाणून घेतल्या व पाणी टंचाई बाबत माहिती प्रत्येक गावात घेतली तसेच गावातील नागरिकांना समाधानही करण्यात आले.तसेच हतरु येथील RFO यांना हतरु, रायपूर, सेमाडोह रस्ता दुरुस्त करण्यात यावे जने करून या रस्त्यावर बसेस सुरू करता येईल असे तोडी निवेदन दयाराम काळे यांनी केले असून RFO यांनी त्वरित रस्ता दुरुस्त करुन देण्याचे आश्वासन दिले आहे.या दौऱ्याच्या भेटी दरम्यान प्रा. मिश्रीलाल झाडखंडे चिखलदरा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी श्री. राहुल येवले महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेस नानकराम ठाकरे चिखलदरा पंचायत समिती सदस्य, पुण्या काका येवले उपसरपंच, सोनाजी सावलकर, सरपंच मारोती पाटणकर पत्रकार, सज्जु सावलकर सरपंच अकुंश बेलेकर, मयुर येवले, रामप्रसाद पंडोले इत्यादी होते.
अमरावती समाज कल्याण सभापती दयाराम काळे यांचा हतरु व चुरनी सर्कलचा झंझावाती दौरा...
राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी
