मातृशक्ती संघटनेने महिलामध्ये जागृती निर्माण केली- किशोर आप्पा भोसले.मातृशक्ती संघटनेच्यावतीने पत्रकार बांधवांचा सत्कार...


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

 संत नगरी शेगाव शहरात स्थापन झालेली व महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर महिलांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या मातृशक्ती संघटनेच्या माध्यमातून महिला वर्गामध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष व खामगाव नगरपालिकेचे नगरसेवक किशोर आप्पा भोसले यांनी येथे  केले. स्थानिक वेंकटेश नगर परिसरातील डाबेराव गल्ली भागात मातृशक्ती संघटनेच्यावतीने शेगाव आणि खामगाव येथील पत्रकार बांधव यांचा सत्कार समारंभ रविवार 21 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. श्री संत गजानन महाराज मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर गजाननराव मुंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट संजय  पोकळे खामगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष किशोर अप्पा भोसले अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष योगेश  हजारे खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक जसवाणी शेगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष देवानंद उमाळे मातृशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सौ वैशाली ताई तायडे प्रमुख म्हणून उपस्थित होते किशोर आप्पा भोसले यांनी पुढे बोलतांना सांगितले की महिलांना दुर्बल कमजोर असल्याचे बोलले जाते मात्र मातृशक्ती संघटनेने गेल्या दोन वर्षापासून महिलांच्या आर्थिक सामाजिक उन्नतीसाठी लहान मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यामुळे महिला शक्ती मध्ये आत्मविश्वास बळावला आहे व त्यांच्यामध्ये जागृती निर्माण झालेले चित्र पहावयास मिळत आहे भविष्यात मातृशक्ती संघटनेचे कार्य अधिकाधिक वाढत जावो यासाठी हवे ते सहकार्य करण्याची पत्रकार म्हणून सर्व पत्रकार बांधव तर्फे मी ग्वाही देतो असे किशोर आप्पा भोसले यांनी म्हटले कार्यक्रमाला उपस्थित एडवोकेट संजय पोकळे सर यांनी सांगितले की पत्रकार हा समाजाचा आरसा असल्याचे म्हटले जाते लोकशाहीचा ज्या पद्धतीने कार्यपालिका ही तिसरी स्तंभ म्हणून ओळखले जाते त्याचप्रमाणे पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते त्यामुळे पत्रकार हे आमचे गुरुबंधू असून मातृशक्ती संघटनेच्या माध्यमातून बैलांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे त्याचा निश्चितच प्रत्येक महिला भगिनी ला लाभ मिळेल व महिला स्वतःचा विकास साध्य करू शकतात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष योगेश हजारे यांनी यावेळी बोलताना सांगितले की मातृशक्ती संघटनेच्या वतीने जे काही समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रम जरी लहान असला तरी समाजाला ते फार मोठा संदेश त्या माध्यमातून देण्याचे कार्य करीत असतात मातृशक्ती संघटनेने आमा पत्रकारांचा सत्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव केला त्यामुळे खरोखरच आम्ही पत्रकार बांधव भारावून गेलेला हो आमच्याकडून जे काही सहकार्य मातृशक्ती संघटनेला लागेल ते आम्ही भविष्यातही देत राहू.. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खामगाव येथील ज्येष्ठ पत्रकार व सांध्य दैनिक खबरे शामतक चे संपादक अशोक जसवाणी यांनी सांगितले की मातृशक्ती संघटनेच्या वतीने महिला इतरांसाठी जे काही कार्य सुरू करण्यात आलेले आहे ते खरोखरच कौतुकास्पद असे कार्य असून या मातृशक्ती संघटनेची भरभराट व्हावी व त्यांच्या माध्यमातून महिला येतात चे तसेच राष्ट्रीय हिताचे कार्य सतत घडत राहो अशा शुभेच्छा प्रदान करतो व मातृशक्ती संघटनेने आम्हाला पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला त्याबद्दल मातृशक्ती संघटनेच्या सर्व महिला भगिनी यांचे आभार मानतो कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषण करतांना डॉक्टर गजानन राव मुंडे यांनी सांगितले की आज महिला घराबाहेर निघण्यास संकोच करतात मात्र मातृशक्ती संघटनेच्या माध्यमातून महिला वर्गामध्ये एक जागृती निर्माण झालेली आहे व त्यामुळे मातृशक्ती संघटने च्या प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात दिसून येते मातृशक्ती संघटनेच्या माध्यमातून आज जो पत्रकार बांधवांचा सत्कार सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे खरोखर समाजाची सेवा करण्यामध्ये पत्रकारही तत्पर असतो त्यांच्या कार्याची कुणीतरी दखल घ्यावी हा विचार करून मातृशक्ती संघटनेच्या महिला भगिनी यांनी पत्रकार बांधवांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा जो सन्मान आणि सत्कार केला तो खरोखरच कौतुकास्पद असा उपक्रम म्हटला जाईल कार्यक्रमाला शेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अरुण भटकर यांनी मार्गदर्शन केले या सत्कार सोहळ्याचे संचलन मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बांधवांचे सन्मानचिन्ह देऊन अखिल भारतीय माळी महासंघाच्या महिला आघाडी बुलढाणा जिल्हाध्यक्षा सरलाताई काळे, मातृशक्ती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वैशालीताई तायडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष रूपालीताई वानखडे, राष्ट्रीय सचिव डॉक्टर शबनम शेख, राष्ट्रीय कोषाध्यक्ष मुक्ताताई ठाकूर ,राष्ट्रीय संघटक लीना ताई भारंबे पाटील मातृशक्ती संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष गीता ताई वाघ अमरावती विभाग अध्यक्ष अलकाताई चंद रिपब्लिकन पार्टी आठवले गट महिला आघाडी तालुकाध्यक्ष रोशनी ताई कबीरदास ,अर्चनाताई कंकाळ जयश्रीताई खेडकर पांडव रमा ताई मनतकार ुषमाताई तायडे , कुमारी रेणुका अरविंद तायडे कुमारी कुसुम रितेश चव्हाण यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार व गौरव करण्यात आला आभार प्रदर्शन राजकुमार व्यास यांनी केले..

Previous Post Next Post