वळतीच्या पाण्याच्या टाकीवरील उपोषणाची आमदार. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते सांगता...


 चिखली ता.प्रतिनिधी:-

वळती येथील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम अनेक दिवसांपासून रखडलेले असल्याने काम तातडीने सुरू करावे यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाण्याच्या टाकीवर सुरू असलेल्या उपोषणाची आमदार श्वेता ताई महाले यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सांगता करण्यात आली . दिनांक 22 मार्च 2021 रोजी सुरू असलेले उपोषण यांच्या हस्ते सोडण्यात आले.वळती येथील गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सन 2015 मध्ये जलस्वराज योजने अंतर्गत विहीर मंजूर झालेली होती व सदर विहिरीचे खोदकाम, बांधकाम व गावातील पाईप लाईनचे काम गत 3 वर्षांपासून अर्धवट करून काम बंद झाले होते. सदर काम पूर्ण व्हावे म्हणून ग्रामपंचायतने वेळोवेळी पाठपुरवठा केला पण सदर ठेकेदाराने व पाणी पुरवठा विभागाने काम पूर्ण केले नाही. त्यामुळे वळती गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच सौ. उज्वलाताई सुनील चिंचोले व ग्रामपंचायत सर्व सदस्य हे जलदिनी दिनांक 22/03/2021 रोजी पाण्याच्या टाकीवर विहिरीचे काम पूर्ण होऊन गावाला पाणी मिळावे यासाठी उपोषणाला बसले होते. तर मा. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी श्री. वारे यांनी 15 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे मा. आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडविण्यात आले.यावेळी सभापती सौ सिधुताई  तायडे ,उपसभापती शमशाद पटेल, तर  उपोषणाला सरपंच सौ. उज्वलाताई चिंचोले, उपसरपंच शे. अस्लम शे. हमीद व श्री. सुनील चिंचोले, भारत गायकवाड, मोसिम खाँ, सौ. मंदा हिवाळे, सौ. राधाबाई जगताप, सौ. दुर्गा धनवे, सौ. तबखूम परवीन उबेद पटेले सर्व ग्रामपंच सदस्य उपोषणाला बसले होते.

Previous Post Next Post