शेगावात अखेर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची अंमलबजावणी.पोलीस आणि नगरपालिकेच्या सतर्कतेमुळे आठवडी बाजार भरला नाही....


 शेगाव ता.प्रतिनिधी:-

मागील दोन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश असतानाही भरणारा आठवडी बाजार आज 23 मार्च रोजी भरला नाही त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या  शहरात आठवडी बाजार न भरण्याबाबत च्या आदेशाची शेगाव नगर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली असे दिसून आले शेगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरूना संसर्गाचा वाढता वेग लक्षात घेता जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये 31 मार्चपर्यंत लॉकडाउन घोषित केलेले आहे या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात कुठेही आठवडी बाजार भरणार नाही असेच स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे मात्र मनाई आदेश असतानासुद्धा शेगाव शहरात 9 मार्च आणि 16 मार्च रोजी मंगळवारी भरणारा आठवडी बाजार पूर्ण क्षमतेने भरला होता भाजी विक्रेत्यांनी व भाजीपाला खरेदी करणाऱ्या ग्राहकांनि प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता आठवडी बाजार परिसरात प्रचंड अशी गर्दी केली होती त्याबाबतचे वृत्त सर्वच प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केले याची दखल घेत 23 मार्च रोजी मंगळवारचा आठवडी बाजार भरणार नाही याबाबत पहाटेपासूनच शेगाव नगर पालिका प्रशासन व शहर पोलीस प्रशासनाद्वारे आठवडी बाजार कडे जाणारे सर्वच रस्ते सील करण्यात आले होते याच प्रमाणे नगरपालिकेने जप्ती पथक सुद्धा तयार ठेवले होते तर आठवडी बाजार परिसरात कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा लावण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की नेहमी प्रमाणे आजही आठवडी बाजार भरणार या अपेक्षेने भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना भाजीपाला खरेदी न करता परतावे लागले मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश पहिल्यांदाच आठवडी बाजाराच्या दिवशी अमलात आणला गेला हे विशेष.

Previous Post Next Post