प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्याच्या दारी.गटविकास अधिकारी पोळ यांचा उपक्रम...


 राजु भास्करे:-अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट मधील अतिदुर्गम चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत एक अभिनव उपक्रम राबविला जात आहे. प्रधान मंत्री आवास इजने अंतर्गत प्रत्येकाला स्वतःचे घर व्हावे हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 2022 पर्यंत यांचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पोळ यांनी घरकुल मंजुरीसाठी शासन आपल्या दारीं हा उपक्रम राबवायला सुरवात केली आहे.महाआवास योजना 2020 च्या प्रभावी अंबलबजावणी साठी प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांच्या दारीं हा उपक्रम पंचायत समिती मार्फत हाती घेतला असून या अभियानात तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांनी शनिवार व रविवारी पूर्ण वेळ ग्रामपंचायत कार्यालय उघडे ठेवावे व सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, संगणक परिचालक, पेसा मोबीलायझर, रोजगार सेवक स्वछता कर्मी यांनाही या अभियानामध्ये सहभागी करावे.व ग्रामपंचायत निहाय पंचायत समिती अंतर्गत अधिकारी व कर्मचारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.ग्रामपंचायत मधून ग्रामसेवकांनी नोडल अधिकारी यांना 'ब ' यादी उपलब्ध करून देण्यात यावी. व चेकलिस्ट नुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पात्र लाभार्थ्यांना भेटून पूर्ण करून घेण्याबाबत नोडल अधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी यांनी सूचित केले आहे. तसेच ज्या लाभार्थ्याकडे घरकुल साठी जागा उपलब्ध नाही अश्या लाभर्थ्यांसाठी नातेवाइकाकडील जागा बक्षीस पत्र म्हणून दुय्यम निबंधक कार्यालय धारणी येथे नेऊन करून घ्यावे अश्या सूचना ही गटविकास अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.आदिवासी गरीब अशिक्षित लाभार्थी घरकुलसाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करू शकत नाही. मात्र या अभियानामध्ये सर्वांचे पूर्तता होईल असा विश्वास ग वि अ यांनी व्यक्त केला आहे. नेहमी नवनवीन उपक्रम राबविण्यात चर्चेत असलेले खंडविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचे सर्वत्र अभिनंदण करण्यात येत आहे.

Previous Post Next Post