जळगांव जा.प्रतिनिधी:-
जळगाव जामोद तालुक्यातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक संघटनेच्या नवीन कार्यकारणी गठित करण्याकरिता जळगाव जामोद येथील वडशिंगी रोड स्थित महासिद्ध महाराज मंदिराच्या हॉलमध्ये सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये नवीन कार्यकारणीचे गठन करण्यात आले.या सभेमध्ये किशोर दाताळकर यांची तालुकाध्यक्ष तर संजय देशमुख यांची तालुका कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.जळगाव जामोद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. हि निवड दिनांक १ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थानिक महासिद्ध महाराज मंदिरावर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्ष म्हणून जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष रंगराव देशमुख तर संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष वाल्मीक रावजी ठाकरे राजू खूपसे पाटील शिवसेना तालुकाप्रमुख गजानन वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हा कार्याध्यक्ष रामराव देशमुख यांनी उपस्थित स्वस्त धान्य दुकानदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की संघटना कोणतीही असो त्या संघटनेने एकजुटीने काम केलं तर संघटनेचा महत्व असते नाहीतर संघटनेचा काहीच महत्त्व राहत नाही तसेच प्रमुख उपस्थित वाल्मीक राव ठाकरे राजू खूपसे पाटील गजानन वाघ यांनीसुद्धा मार्गदर्शन केले तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते व एकजुटीने करण्यात आली नवीन तालुकाध्यक्ष म्हणून किशोर दाताळकर तालुका कार्याध्यक्ष संजय देशमुख सचिव पदी किसना झाटे सहसचिव विजय हिस्सल उपाध्यक्षपदी अरुण भाऊ पारवे शालिग्राम दाते श्याम भाऊ जाधव अरुण साबळे अजय खेळकार कोषाध्यक्षपदी आताऊल्ला खान यांची निवड करण्यात आली यावेळी तालुक्यातील बहुसंख्य स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते.
