श्री संत अच्युत महाराज यांचा ९ वा पुण्यतिथी महोत्सव संपन्न..चांदीचा मुखवटा पालखी त घेऊन काढण्यात आली मिरवणूक...


 राजु भास्करे / अमरावती.

श्री संत अच्युत महाराज यांचा ९ वा पुण्यतिथी महोत्सव श्रीक्षेत्र शेंदुरजना बाजार येथे संपन्न झाला सकाळी ५:३० वाजता ध्यानप्रार्थना ७;०० वाजता वंदनीय बाबांचा चांदीचा मुखवटा पालखित घेऊन मिरवणुक काढण्यात आली,८;३०ते १० वाजेपर्यंत श्री रघुनाथ दादा कर्डीकर यांच्या सुश्राव्य गायनाने चरीञ  गायन झाले,१०:०५ वाजता वंदनीय श्रीसंत अच्युत महाराजाना साश्रु नयनांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली,श्री संत भानुदास महाराजांचे आर्शिवादपर प्रवचन ,ह,भ,प.कनेरकर महाराजांचे काल्याचे किर्तन झाले,श्री डॉ,अनिलपंत सावरकर यांचे अध्यक्षीय  भाषण झाले, मान्यवरांची मनोगते झालीत,शेवटी समारोपीय अमृततुल्य प्रवचन श्री ह,भ,सचिन देव महाराजांनी प्रवचन केले, गांवकरी मंडळीं श्री मनोहर निमकर, नारायण बोडखे ,जगदिश काळे,प्रमोद निमकर,विवेक सावरकर ,भास्कर बोडखे, राजेंद्र देवळे,सतिश सावरकर,दादाराव शेळके,देवीदास सावरकर,प्रविण भोजने, राजेंद्र सावरकर,शुभम देवळे, वामनराव भोजने,जगदिश देवळे,पवन भोजने,सौ प्रतिक्षाताई प्रशांत कुरळकर सरपंच व भक्त मंडळी उपस्थित होती, श्रद्धांजलीचा कार्यक्रम  आँनलाईन घेण्यात आला,कोरोना महामारी मुळे कार्यक्रम थोडक्यात घेण्यात आला,

Previous Post Next Post